
no images were found
स्कोडा ऑटोकडून भारतासाठी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची घोषणा
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी योजनांची घोषणा केली आहे. ही एसयूव्ही भारतात २०२५ च्या पहिल्या सहामाहीमध्ये पदार्पण करेल. हे कंपनीचे तिसरे मेड–फॉर–इंडिया उत्पादन आहे. नवीर कार कुशक आणि स्लाव्हिया प्रमाणे एमक्यूबी–एओ इन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या नवीन लाँचसह स्कोडा ऑटो इंडियाचे २०२६ पर्यंत १००,००० वार्षिक विक्री संपादित करण्याचे लक्ष्य असेल.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो ए.एस.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्लॉस झेलमर म्हणाले, भारत स्वत:ची बाजारपेठ क्षमता आणि नवीन बाजारपेठांसह आसियान व मध्य पूर्वमध्ये आमच्या विस्तारीकरणासाठी विकास व उत्पादन केंद्र म्हणून स्कोडा ऑटोच्या जागतिक विकासासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आम्ही २०२१ पासून भारतात विक्री दुपटीहून अधिक केली आहे आणि आम्ही आता भारतातील व जगभरातील ग्राहकांसाठी डिझाइन केलेल्या मॉडेल्सची श्रेणी अधिक वाढवत पुढील पाऊल उचलत आहोत. २०२५ मध्ये पदार्पण करणारी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण विभागाची भर करेल. मला विश्वास आहे की, विस्तार करण्यात आलेला स्कोडा पोर्टफोलिओ भारतातील २०३० पर्यंत फोक्सवॅगन ब्रॅण्ड्स समूहासाठी जवळपास ५ टक्क्यांनी मार्केट शेअर संपादित करण्याच्या आमच्या विकास लक्ष्याप्रती योगदान देईल.
कंपनीच्या घोषणेबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर जनेबा म्हणाले, मला घोषणा करताना आनंद होत आहे की, आजपासून वर्षभरात स्कोडा ऑटो भारतीय बाजारपेठेत नवीन कार – कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार आहे. या लाँचसह आम्ही नवीन व विद्यमान ग्राहकांशी संलग्न होण्याकरिता नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि अग्रणी फॉर्मेट्ससह सर्व स्तरावर आमच्या कर्मचारीवर्गामध्ये वाढ करू. आम्ही आमच्या विक्री व विक्रीपश्चात्त व्हर्टिकल्ससाठी प्रशिक्षण व कार्यशाळांना सुरूवात केली आहे आणि ग्राहक समाधानवर लक्ष केंद्रित करत राहू. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह आम्हाला २०२६ पर्यंत १००,००० वार्षिक विक्री आकारमान संपादित करण्याचा विश्वास आहे.
स्कोडा ऑटो इंडियाचे पुण्याजवळील चाकण येथे संपूर्ण सुसज्ज उत्पादन युनिट आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये पार्टस् व कम्पोनण्ट्स केंद्र आहे. ही केंद्रे स्कोडा ऑटो इंडियाच्या भारतातील अधिक विस्तारीकरण व विकास योजनांसाठी धोरणाचा भाग आहेत. भारतीय बाजारपेठेतील क्रियाकलाप स्कोडा ऑटोच्या नेक्स्ट लेव्हल स्ट्रॅटेजीचा भाग आहेत. स्कोडाचा २०३० पर्यंत सर्वाधिक विक्री होणारा युरोपियन ब्रॅण्ड बनण्याचा आणि प्रांतासाठी आपल्या जबाबदारीचा भाग म्हणून सर्व फोक्सवॅगन ग्रुप ब्रॅण्ड्ससाठी पाच टक्के मार्केट शेअर संपादित करण्याचा मनसुबा आहे.
एमक्यूबीएओइन प्लॅटफॉर्मच्या ग्राऊंड्सअप डिझाइन व विकासाने स्कोडा ऑटो इंडियाला कारचे जवळपास ९५ टक्के स्थानिकीकरण करण्यास मदत केली आहे. यामुळे ग्राहक मालकीहक्काचा कमी खर्च व टर्नअराऊंड टाइम्सचे फायदे घेऊ शकले आहेत, तसेच ४ वर्षांची वॉरंटी आणि जवळपास ८ वर्षांपर्यंत अतिरिक्त वॉरंटीने ग्राहकांना मन:शांती दिली आहे. युरो एनसीएपी अंतर्गत ५–स्टार रेटिंग मिळालेल्या कोडियक लक्झरी ४x४ सह संयोजित स्कोडा ऑटो इंडियाचा भारतात ५–स्टार सुरक्षित व टेस्टेड कार्सचा ताफा आहे.
संस्कृती, वारसा व हेरिटेज दिसून येणारी विशिष्ट कार नाव प्रदान करणारी परंपरा कायम राखत स्कोडा ऑटो इंडियाने या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी नामकरण मोहिमेची घोषणा केली आहे. वापरकर्ते, ग्राहक व चाहत्यांना या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे नाव सुचवण्यास सक्षम करण्याच्या प्रयत्नात स्कोडा ऑटो इंडियाने #NameYourSkoda मोहिमेची घोषणा केली आहे, जेथे देशातील या विभागामधील या पहिल्या स्कोडा उत्पादनासाठी संभाव्य नाव सुचवण्याकरिता भारतभरातून प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत.