Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात ‘मंथली इनोव्हेशन चॅलेंज’ ची निर्मिती

शिवाजी विद्यापीठात ‘मंथली इनोव्हेशन चॅलेंज’ ची निर्मिती

10 second read
0
0
65

no images were found

शिवाजी विद्यापीठात ‘मंथली इनोव्हेशन चॅलेंज’ ची निर्मिती
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य कंेद्राअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ‘एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या सेक्शन-8 कंपनीतर्फे मंथली इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाची निर्मिती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी, संशोधक व नागरिकांना उद्भवणा-या विविध समस्यांवर नावीण्यपूर्ण उत्तरे सुचविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक विषय देऊन त्यावर शोधलेले कल्पक पर्याय अथवा उत्तर विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या वेबसाईटवरील News and Event- Monthly Innovation Challenge- August 2022 या लिंकवरील गुगल फॉर्ममध्ये भरावयाचे आहे. या प्रक्रियेतून नावीन्यपूर्ण संकल्पनातून स्टार्टअप स्थापन करणे व त्याद्वारे तंत्रज्ञानाचे समाज हितासाठी प्रभावी हस्तांतरण करणे सोपे होणार आहे. या महिन्याचे चॅलेंज हे “Fintech Based Idea” या संकल्पनेवर असून, त्याद्वारे सामान्य माणसाच्या समस्यांवर नवसंकल्पना सादर करण्याचे आवाहन नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य कंेद्राचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी

डॉ. आंबेडकर यांना लोकशाहीकडे नेणारे शिक्षण अभिप्रेत: डॉ. गौतम गवळी   कोल्हापूर,(प्रति…