no images were found
विरोधकांचा खोटा कांगावा जनतेपुढे उघडा : श्री.राजेश क्षीरसागर यांची टीका
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कोल्हापूर शहर हे कलानगरीसह क्रीडानगरी आणि कुस्तीपंढरी बरोबरच “फुटबॉल पंढरी” म्हणून संबोधले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉल खेळास सुमारे १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. स्वातंत्र पूर्व काळापासून कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळला जात असून, स्वातंत्र पूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. असा हा फुटबॉल खेळ कोल्हापूरची जीवनवाहिनी असून, देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षकवर्गही कोल्हापुरच आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण या अभावी कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपट्टू स्थानिक संघासहपुरते मर्यादित राहिले आहेत. तर ठराविक खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लब कडून खेळत आहेत. या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी राज्य शासनाकडून रु.३०० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमीच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी काळात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत श्री रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोड पर्यंत फुटबॉल स्ट्रीट विकसित करणे या कामाचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. फुटबॉल स्ट्रीट विकसित करण्याच्या कामास रु.५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या दोन वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना कधीही एका मतदार संघापुरते काम मर्यादित न ठेवता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य दिले आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ज्यांनी ५ वर्षे उत्तर मतदार संघासाठी काहीच काम केले नाही आणि “चोराच्या उलट्या बोंबा” या उक्तीप्रमाणे आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांच्याकडे या फुटबॉल स्ट्रीटची संकल्पना मांडून निधी मंजुरीसाठी पाठपुरावा मी केला आहे. तत्कालीन पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी हा निधी मंजूर केला. त्याचा पुरावा आम्ही सादर केला आहे. त्याबद्दल ना.मा.श्री.दीपक केसरकर यांचे आभार.. पण गेल्या ५ वर्षात पालकमंत्री म्हणून ज्यांना कोल्हापूरच्या विकासात ठोस योगदान देता आले नाही पण आता सुरु असणाऱ्या शहराच्या विकास कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा सर्वप्रथम निषेध करतो. ज्यांना राजकारण करायचं आहे ते करू देत. आम्हाला जिल्ह्याच्या विकासाचे ध्येय आहे. त्यामुळेच कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी खासदार मा.श्री.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रु.३०० कोटींच्या फुटबॉल अॅकॅडमीची स्थापना आगामी काळात करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांचा खोटा कांगावा जनतेपुढे उलघडत असून, कोल्हापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभी राहील, असे प्रतिपादन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजीत चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, अजित मोरे, संपत जाधव, शिवसेनेचे सचिन पाटील, रणजीत मंडलिक, क्रांतीकुमार पाटील, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण, अविनाश कामते, कुणाल शिंदे, अश्विन शेळके, दादू शिंदे, रविंद्र पाटील, विशाल पाटील, प्रदीप मोहिते, अनिल निकम, महावीर पोवार, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, निलेश हंकारे, टिंकू देशपांडे, प्रशांत जाधव, रणजीत सासणे, सुरेश माने, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, नम्रता भोसले, गौरी माळदकर, शारदा भोपळे यांच्यासह भागातील नागरिक, खेळाडू, तालीम संस्था मंडळाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.