
no images were found
कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन यांच्याकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस एक लाख शेणी
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहरात पंचगंगा, कसबा बावडा,बापट कॅम्प व कदमवाडी या 4 ठिकाणी स्मशानभूमी आहेत. सद्यस्थितीत पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणेकरिता शेणीची आवश्यकता असलेने शहरातील दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांना महानगरपालिकेमार्फत पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी देवून महानगरपालिकेस सहकार्य करणेबाबत आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देऊन कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन यांच्याकडून आज पंचगंगा स्मशानभूमीस एक लाख शेणी देण्यात आल्या. सदरच्या शेणी कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडे सुर्पूद केल्या. महापालिकेच्यावतीने या सर्वांचे मुख्य आरोग्य निरिक्षक यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर, सेक्रेटरी प्रसन्न तारदाळकर, ट्रेजरर कमलाकांत कुलकर्णी, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले उपस्थित होते.