Home सामाजिक  प्रादेशिक वस्त्रोद्योग सामर्थ्याद्वारे भारताच्या वाढत्या वस्त्रोद्योगाचा उत्सव साजरा केला

 प्रादेशिक वस्त्रोद्योग सामर्थ्याद्वारे भारताच्या वाढत्या वस्त्रोद्योगाचा उत्सव साजरा केला

1 min read
0
0
24

no images were found

 प्रादेशिक वस्त्रोद्योग सामर्थ्याद्वारे भारताच्या वाढत्या वस्त्रोद्योगाचा उत्सव साजरा केला

 भारत टेक्स 2024,भारतातील प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील प्रतिष्ठित हातमाग आणि हस्तकला परंपरेचा भव्य संगमाचे प्रदर्शन करणार आहे. पाच भारतीय राज्ये कलात्मक उत्कृष्टतेचे सामायिक वर्णन सादर करताना, हातमाग कारागिरीचे वैशिष्ट्य आणि विशिष्ट वस्त्रोद्योगामधील नवकल्पनांचे अनावरण करून प्रकाशझोत आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सज्ज झाली आहेत.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांनी ‘भागीदार राज्य’ म्हणून एकत्र येणाची अनुमति दिल्यानंतर, भारत टेक्स 2024 ने गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश ‘सहाय्यक भागीदार राज्ये’ म्हणून सामील होण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि आसाम ही राज्ये जागतिक वस्त्रोद्योग महोत्सवात राज्य मंडप उभारणार आहेत.  भारत टेक्स 2024 मध्ये जागतिक स्तरावर नावाजलेल्या राज्यांच्या हस्तकला आणि हातमाग परंपरा, जसे की मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बाटिक प्रिंटिंग, हँडब्लॉक प्रिंटिंग, चंदेरी आणि माहेश्वरी  सिल्क, गुजरातची बांधणी, पटोला सिल्क, हाताने केलेले पेंटिंग, उत्तर प्रदेशची चिकनकरी, झरी-जरदोजी, महाराष्ट्राची पैठणी साडी, वारली कला, मशरू आणि हिमरूपासून ते आंध्र प्रदेशच्या बहुचर्चित जूट, हाताने रेखाटलेली कळमकरी, हाताने विणलेल्या गर्भश्रीमंत धर्मावरम साड्या आणि उत्तम मंगलगिरी कापूस विणकाम, आणि याचबरोबर त्यांची धोरणे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि आगामी वस्त्रोउद्योग पार्कसारख्या उपक्रमांच्या बाबतीत राज्याच्या पुरोगामी उपक्रमांचा गौरव केला जाईल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे म्हणाले,”भारत टेक्स 2024 मध्ये भागीदार राज्य म्हणून महाराष्ट्राच्या सहभागाची घोषणा करताना मला अभिमान वाटतो. भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणून, हा कार्यक्रम उद्योग सहकार्य आणि नाविन्यपूर्णतेसाठी सर्वात मोठे व्यासपीठ म्हणून आकार घेत आहे. भारतातील वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा आहे; पैठणी साडीची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असो किंवा काही महत्त्वाकांक्षी स्टार्ट-अप्सने केलेली स्मार्ट टेक्सटाइल्सची प्रगती असो. वस्त्रोद्योग आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र महाराष्ट्राच्या आर्थिक परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि त्याचे निरंतर यश जोपासण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 2047 मध्ये विकसित भारताच्या दिशेने आपल्या देशाच्या प्रगतीच्या समृद्ध प्रवाहात प्रत्येक धागा जोडला जाईल याची खात्री महाराष्ट्र करेल. मध्य प्रदेश ‘सहाय्यक भागीदार राज्य’ म्हणून सामील झाल्याबद्दलमध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले,”मध्य प्रदेशची समृद्धी तेथील उद्योगांच्या प्रगतीमध्ये आहे. उद्योगांच्या स्थापनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतात. सर्वंकष विकास, सुशासनाला चालना आणि प्रभावी यंत्रणा राबविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, “गुजरातसाठी वस्त्रोद्योग हा केवळ एक उद्योग नाही, तर एक परंपरा आणि वारसा आहे जो आम्ही आपल्या हस्तकला आणि यंत्रांच्या जादूद्वारे जगासमोर सादर करतो. वस्त्रोद्योग क्षेत्राची वाढ ही भारताच्या विकासात आणि रोजगाराच्या संधींच्या वाढीत आहे. आपला वस्त्रोद्योग हा 5 एफ (फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) या संकल्पनेची पूर्तता करणारा दीपस्तंभ म्हणून उभा आहे, जी आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. आज गुजरात जगभरातील कपड्यांच्या आयातदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’मध्ये अग्रेसर होण्याची आमची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करणारे गुजरात हे देशभरातील फायबर उत्पादनात सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे.

तेलंगण ‘सहाय्यक भागीदार राज्य’ म्हणून पुढे आल्यानेतेलंगणाचे मुख्यमंत्री श्री अनुमुला रेवंत रेड्डी म्हणाले, “ऐतिहासिकदृष्ट्या, वस्त्रोद्योगाचा संस्कृतीच्या विकासाशी अनोखा संबंध आहे आणि वस्त्रोद्योगासाठी भारताचे जगात अद्वितीय नेतृत्वाचे स्थान आहे. अशा दृष्टिकोनातून भारत टेक्स 2024 हा निर्यात प्रोत्साहन परिषदेचा स्वागतार्ह उपक्रम आहे, केवळ भारताची अनोखी कापड उत्पादने जगासमोर प्रदर्शित करण्यासाठीच नव्हे, तर वस्त्रोद्योग आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते. तेलंगणाला हातमागांचा जीवंत, वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वारसा लाभला आहे, ज्यात गडवाल, नारायणपेट, पोचमपल्ली इक्कट प्रकारचे कापड आणि बंजारा कला, बिद्री इत्यादी हस्तकला यांचा समावेश आहे. तेलंगणा हे वस्त्रोद्योगाचे एक अग्रगण्य उत्पादन केंद्र आहे, ज्याची सर्व 5 एफ क्षेत्रांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. भारत टेक्स 2024 सह, आम्ही तेलंगणाची वस्त्रोद्योगाची कथा संपूर्ण जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी सुई जेनेरिस प्लॅटफॉर्मचा फायदा घेण्यास उत्सुक आहोत.

भारत टेक्स 2024 च्या मध्यभागी कलाकार आणि डिझायनर्सना आपला अमिट ठसा उमटवण्याची आणि इतिहास रचण्याची अनोखी संधी आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे भारत टेक्स येथे ‘परंपरा आणि नाविन्यपूर्णतेचे धागे’ या संकल्पनेवर आधारित MyGov अधिकृत वेबसाइटवर भारत टेक्स स्मृतिचिन्ह डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला रुपये10,000, द्वितीय क्रमांकाला रुपये3,000 व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला रुपये2,000 चे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेते डिझाइन भारत टेक्स 2024 दरम्यान मान्यवरांना प्रदान केले जाईल.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीतर्फे (सीआयटीआय) आयोजित टेक्सटाइल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड्स 2024 ची आतुरतेने वाट पाहिली जात असून, 27 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या भारत टेक्स कार्यक्रमात हा सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम उद्योगातील नेते, धोरणकर्ते आणि शाश्वततेचे चॅम्पियन यांना एकत्र आणेल आणि वस्त्रोद्योगाने अधिक शाश्वत आणि पर्यावरणविषयक जागरूक भविष्याच्या दिशेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करेल.

फोर्टम, लेनझिंग, एच अँड एम, बुसाना ग्रुप आणि ह्योसुंग कॉर्प सह आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग कंपन्यांचा सहभाग जागतिक वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित करतो, ज्यामुळे देशाच्या वस्त्रोद्योगात गुंतवणूक वाढण्याची अनुकूल शक्यता दर्शविली जाते. उद्योगांच्या सहभागाव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया, इटली, तुर्की, दक्षिण कोरिया, बांगलादेश, रशिया, पेरू, इजिप्त आणि थायलंड सह प्रमुख टेक्सटाईल हबमधील मंत्रिस्तरीय आणि व्यावसायिक शिष्टमंडळे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

वस्त्रोद्योगातील वाढ, नावीन्य आणि शाश्वतता वाढविण्याच्या दिशेने हे सहकार्य महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असले तरी सुमारे 2 लाख चौरस फूट क्षेत्रफळ आणि 50+ ज्ञान सत्रांमध्ये पसरलेल्या या मोठ्या कार्यक्रमात कपडे, होम फर्निशिंग, फ्लोअर कव्हरिंग, फायबर्स, सूत, धागे, कापड, प्रिंटिंग तंत्र, कार्पेट, रेशीम, वस्त्रोद्योग आधारित हस्तकला, तांत्रिक वस्त्रोद्योग आणि बरेच काही यांचे प्रदर्शन करणाऱ्या कंपन्यांचे प्रभावी मिश्रण समोर येणार आहे. 

नावीन्य, सहकार्य आणि ‘मेक इन इंडिया’ भावनेच्या मुळाशी असलेले भारत टेक्स 2024 हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5एफ व्हिजनचे मूर्त रूप आहे – फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन जे या एक्स्पोचे उद्घाटन करणार आहेत.   हा कार्यक्रम जागतिक स्तरावरील सर्वात मोठा वस्त्रोद्योग कार्यक्रम आहे, ज्यात 40 पेक्षा जास्त देशांमधील 3500+ प्रदर्शक आणि 40,000+ अभ्यागतांचा समावेश आहे. भारत टेक्स 2024 हा संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे व्यापक प्रदर्शन असेल, ज्यात भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कापड परंपरेचे प्रदर्शन करण्यापासून ते अद्ययावत तांत्रिक नवकल्पनांपर्यंत सगळे प्रदर्शित केले जाइल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …