
no images were found
महिंद्रातर्फे जपण्यात आली ट्रक चालकांच्या मुलींना सक्षम बनवण्याची आपली बांधिलकी
१२ फेब्रुवारी २०२४: महिंद्रा समूहाचा एक भाग असलेल्या महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजन (MTBD) ने महिंद्रा सारथी अभियान शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ट्रक चालकांच्या मुलींना सक्षम बनवण्याची आपली बांधिलकी कायम ठेवली आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाच्या हक्काला पाठबळ देत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी आपले छोटे योगदान देणारा हा उपक्रम आहे. तामिळनाडू नमक्कल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिंद्रा अँड महिंद्राचे व्यावसायिक वाहने, व्यवसाय प्रमुख श्री. जलज गुप्ता यांच्या उपस्थितीत ही शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.
हा प्रयत्न म्हणजे महिंद्रा ट्रक आणि बस विभागाच्या ट्रक चालक समुदायाप्रती अखंड सुरू असलेल्या बांधिलकीमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्याची सुरुवात २०१४ मध्ये महिंद्रा सारथी अभियानासोबत करण्यात आली होती. यासाठीच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण भारतातील ७५ हून अधिक ट्रान्सपोर्ट हब समाविष्ट आहेत आणि त्यासाठी चांगल्या प्रकारे परिभाषित, पारदर्शक आणि स्वतंत्र प्रक्रिया आहे.
उद्योगक्षेत्रातील या महत्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यावसायिक वाहन – व्यवसाय प्रमुख श्री. जलज गुप्ता म्हणाले, “आम्ही समुदायांना सक्षम करण्यात आणि शाश्वत सामाजिक प्रभाव निर्माण करण्यात आघाडीवर आहोत. हा अनोखा उपक्रम देशाच्या दुर्गम भागात पोहोचला आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तरुण मुलींना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व्यासपीठ देऊन सक्षम बनवण्याच्या आमच्या अतूट बांधिलकीचे दर्शन यातून झाले. महिंद्रा सारथी अभियान हा ट्रक चालक समुदायाचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी दाखवलेल्या अनुकरणीय प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा मार्ग आहे.”