
no images were found
राजस्थानी जैन श्वेताबंर समाज अंतिम सेवा ग्रुपकडून महापालिकेच्या स्मशानभूमीस 41 हजार शेणी
कोल्हापूर : महानगरपालिकामार्फत शहरात पंचगंगा, कसबा बावडा,बापट कॅम्प व कदमवाडी या 4 ठिकाणी स्मशानभूमी आहेत. सद्यस्थितीत पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणेकरिता शेणीची आवश्यकता असलेने शहरातील दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था यांना महानगरपालिकेमार्फत पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी देवून महानगरपालिकेस सहकार्य करणेबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन राजस्थानी जैन श्वेताबंर समाज अंतिम सेवा ग्रुपच्यावतीने आज पंचगंगा स्मशानभूमीस 41 हजार शेणी दिल्या.
या शेणी पंचगंगा स्मशानभूमी येथे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्याकडे सुर्पूद केल्या. महापालिकेच्यावतीने मुख्य आरोग्य निरिक्षक यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, नंदूभाई ओसवाल, जवेरचंद गांधी, माणिक सुराणा, गिरीश गुंदेशा, प्रवीण ओसवाल, कांतीलाल ओसवाल, प्रकाश परमार, प्रकाशमामा ओसवाल, दिलीप ओसवाल, नरेंद्र राठोड उपस्थित होते