no images were found
स्नायडर इलेक्ट्रिकची ‘इनोव्हेशन यात्रा’ कोल्हापुरात पोहोचली
कोल्हापूर : ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशनच्या डिजिटल परिवर्तनातील जागतिक आघाडीच्या श्नाइडर इलेक्ट्रिकने ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीच्या भारत प्रवेशाच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त स्नायडर इलेक्ट्रिक इनोव्हेशन यात्रा सुरू केली. या यात्रेच्या केंद्रस्थानी कार्बन न्यूट्रल मोबाइल इनोव्हेशन हब ऑन व्हील्स हे आहे. या अंतर्गत स्नायडर इलेक्ट्रिकची IoT सक्षम साधने, कनेक्टेड उत्पादन ऑफर, कंपनीची भारतातील प्रगती, आणि भारताच्या प्रगतीमधील योगदान मांडले जाते. उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील शहरांमधून प्रवास करून येऊन आता मोबाईल इनोव्हेशन हब कोल्हापुरात पोहोचले आहे. मौर्या ग्लोबल, प्लॉट क्रमांक: A-264, 5-स्टार MIDC, कागल-हातकणगले औद्योगिक क्षेत्राशेजारी या यात्रेचा मुक्काम आहे. ग्राहक, सरकारी अधिकारी, विद्यार्थी, चॅनल भागीदार आणि एन्फ्लुएन्सरना ही मोबाइल इनोव्हेशन ऑन व्हील्स आकर्षित करते.
ही कार्बन न्यूट्रल यात्रा 6 महिन्यांत भारतातील 60+ शहरांमध्ये जाणार आहे. श्नाइडर इलेक्ट्रिकचा उद्देश देशातील 60 वर्षांचा प्रवास आणि देश उभारणीतील कंपनीची वचनबद्धता सांगणे हा आहे. IoT, इलेक्ट्रिसिटी 4.0, ऊर्जा व्यवस्थापनात डिजिटायझेशन तसेच सातत्य आणि ऑटोमेशन स्पेसमधील आघाडीचे ज्ञान देत ही देश उभारणी केली जाणार आहे. 20Mn+ हून अधिक नागरिक, कॉर्पोरेट्स, उद्योग तज्ञ, धोरणकर्ते, भागीदार, ग्राहक, शेतकरी, इलेक्ट्रिशियन, संस्था, सरकार यांच्या सोबत जोडले जाऊन शाश्वतता आणि डिजिटायझेशनचा संदेश पसरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. इको-फ्रेंडली मोबाइल हब हे पुन्हा वापरण्यायोग्य सामग्रीच्या साहाय्याने चार्ज केले जाते. तसेच नूतनीकरणक्षम उर्जेने सक्षम आहे ज्यामध्ये ल्युमिनस सोलर पॅनेलचा समावेश होतो. याद्वारे IOT सक्षम सोल्यूशन्स, कनेक्टेड उत्पादन ऑफर, भारतातील समूहाचा प्रवास, भारताच्या वाढीसाठी कंपनीचे योगदान आणि विशेष ‘ग्रीन योद्धा’ सस्टेनेबिलिटी झोनची माहिती दिली जाते.
या उपक्रमाविषयी बोलताना, दीपक शर्मा, झोन अध्यक्ष – ग्रेटर इंडिया आणि एमडी आणि सीईओ, श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया म्हणाले, “आमची भारतातील 60 वर्षांची उपस्थिती ही देशाच्या प्रगतीसाठी आमच्या कायम वचनबद्धतेचा पुरावा आहे. Schneider Electric कडे आता 37000+ कर्मचारी आहेत, भारतात 30 उत्पादन साइट आहेत, ज्यामुळे ती 3री सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे तर चौथे जागतिक केंद्र समूह आहे. श्नायडर इलेक्ट्रिक इनोव्हेशन यात्रा हे आमच्या भागधारकांशी कनेक्ट होण्यासाठी आणि त्यांच्याशी संलग्न होण्यासाठी, आमची उपलब्धी साजरी करण्यासाठी आणि शाश्वत नवकल्पना आणि डिजिटायझेशन चालविण्याची आमची वचनबद्धता प्रदर्शित करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ आहे. आमचा विश्वास आहे की, अमृत काळात शाश्वत भारत निर्माण करण्याचा दृष्टीकोन सहयोगी कृतींद्वारे साध्य केला जाऊ शकतो. आमचे ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांनी विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे.”
कंपनीच्या मार्केटिंगबाबत सांगताना, रजत अब्बी, उपाध्यक्ष- ग्लोबल मार्केटिंग, मुख्य विपणन अधिकारी, श्नाइडर इलेक्ट्रिक इंडिया म्हणाले, “या कार्बन न्यूट्रल यात्रेमध्ये श्नाइडर इलेक्ट्रिक देत असलेल्या शाश्वत, डिजिटल आणि नेक्स्ट जनरेशन उपायांबाबत जागरूकता निर्माण केली जाते. यासाठी संपूर्ण देशात फिरण्याचा कंपनीचा विचार आहे. ही अनोखी मोहीम आमच्या ग्रीन योद्धा या उपक्रमाचा विस्तार आहे. याचा उद्देश व्यापक आणि वैविध्यपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आणि हवामान बदलाविरुद्धच्या चांगल्या लढ्यात अधिक भागधारकांना सहभागी करून घेणे, हा आहे. आमच्या मार्केटिंग प्लेबुकमध्ये उद्देश, भागीदारी, ग्रह आणि कामगिरी या 4P वर भर दिला आहे. या उपक्रमात डिजिटल, भौतिक, सामाजिक आणि सर्व-चॅनल उपस्थितीचे अनोखे मिश्रण असून ते लाखो भारतीयांपर्यंत पोहोचते.”
भारतीय बाजारपेठेत श्नाइडर इलेक्ट्रिकने आपला ठसा उमटवला आहे. L&T इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन, Luminous, AVEVA यासह अनेक लोकप्रिय ब्रँडसह ती भक्कमपणे पाय रोवून उभी आहे. वैविध्यपूर्ण उद्योग विभागांसाठी Schneider Electric ऊर्जा व्यवस्थापन, नेक्स्टजेन ऑटोमेशन आणि सस्टेनेबिलिटी सोल्यूशन्समध्ये आघाडीवर आहे. L&T इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन (E&A) विविध क्षेत्रांमध्ये वीज वितरण, ऑटोमेशन आणि नियंत्रण यासाठी उत्पादने, उपाय आणि टर्नकी सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. ल्युमिनस पॉवर टेक्नॉलॉजीज हा पॉवर बॅकअप आणि निवासी ठिकाणांसाठी सोलर स्पेसमध्ये नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसह एक विश्वासार्ह ब्रँड आहे. डिजिटल परिवर्तन आणि टिकाऊपणा याला चालना देणारे AVEVA हे औद्योगिक सॉफ्टवेअरमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. थोडक्यात, आमच्या ग्राहकांसाठी आम्ही ग्रिड ते प्लग, उपकरणे ते उद्योग, घटक ते क्लाउडपर्यंत अशा विविध पर्यायात भागीदारी देतो.
श्नायडर इलेक्ट्रिक इनोव्हेशन यात्रा भारताच्या विविध परिसंस्थेशी, नागरिकांपासून कॉर्पोरेट्सपर्यंत, शेतकऱ्यांपासून संस्थांपर्यंत आणि अधिक लोकांशी जोडेल. नाविन्यपूर्ण उपायांद्वारे हवामान बदल सुलभ करणे तसेच चांगल्या हवामानासाठी प्रयत्न करणारे ग्रीन योद्धा तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
कोल्हापूरपूर्वी ही यात्रा दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, भिवडी, कुंडली, यमुना नगर, चंदीगड, मोहाली, लुधियाना, बड्डी, रुरकी, मुझफ्फरनगर, पंत नगर, कानपूर, लखनौ, आग्रा, जयपूर, सिंगरौली, जबलपूर, इंदूर, भोपाळ, अहमदाबाद, साणंद, मेहसाणा, मोरबी, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे-भोसरी, येथेही जाऊन आली आहे.