no images were found
पुणे की पसंत, मोरे वसंत’, मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले. या विषयावरून दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला वाद अद्यापही सुरू आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. दुसरीकडे २७ फेब्रुवारी रोजी देशभरात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी कोण-कोण उमेदवार दिले जाणार याची चर्चा सुरू आहे. नुकतीच पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. तर मराठा आरक्षणासाठी १० फेब्रुवारीपासून बेमूदत उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आज ते छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात दौऱ्यासाठी आले आहेत. नाशिकमध्ये येऊन ते भुजबळ यांच्याबद्दल काय बोलतात, याकडेही आपले लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.