no images were found
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड व हेल्थ कार्ड प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व मुख्य इमारतीत उपलब्ध
कोल्हापूर : शहरातील पात्र नागरीकांना गोल्डन कार्ड, आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ई-कार्ड व हेल्थ कार्ड देण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी पात्र/अपात्र लाभार्थ्यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सकाळी 8.00 ते दु.1.00, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांकडे सकाळी 8.00 ते दु.4.00 या वेळेमध्ये व महापालिका मुख्य इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात शनिवार, दि.3 फेब्रुवारी 2024 रोजी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन-आरोग्य योजना ई-कार्डचे जिल्हयात 1141187 पात्र लाभार्थी असून त्यांची यादी पाहणेस महापालिका मुख्य इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात उपलब्ध आहे. ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून ही योजना विमा आणि हमी तत्वावर राबविण्यात येत आहे. एकत्रिक योजनेअंतर्गत समाविष्ठ असलेल्या कुटुंबापैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीनुसार लाभार्थीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डचे 1.50 लाख व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी असल्यास 3.50 लाख असे 5 लाख आरोग्य विमा मोफत मिळतो. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी रेशनकार्ड व त्याचा 12 अंकी ऑनलाईन रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर, स्वत: लाभार्थी समक्ष असणे आवश्यक आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्डचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आयुष्यमान-भारत ई कार्ड व आधार कार्ड आवश्यक आहे. या योजनेचा लाभ सदर योजनेअंतर्गत 34 स्पेशालिटीमध्ये कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया,मूत्रपिंड व मूत्र मार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, बालरोग, स्त्री-रोग, नेत्र शस्त्रक्रिया (मोतीबिंदू वगळून), सांधेरोपण इत्यांदीवर एकूण 1209 गंभीर आजारांवरती प्रति कुटुंब 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळेल.
तरी पात्र लाभार्थ्यांनी महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधून आपले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्ड (ई-कार्ड) तयार करुन घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.