Home सामाजिक ‘एम. बी. ए. युनिट शिवाजी विद्यापीठमार्फत हुतात्मा दिनी रक्तदान शिबिर

‘एम. बी. ए. युनिट शिवाजी विद्यापीठमार्फत हुतात्मा दिनी रक्तदान शिबिर

0 second read
0
0
25

no images were found

‘एम. बी. ए. युनिट शिवाजी विद्यापीठमार्फत हुतात्मा दिनी रक्तदान शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी): दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या एम. बी. ए. विभागाच्या वतीने बुधवार दि. ३० जानेवारी, २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. व्ही. ए. रानडे यांनी रक्तदानामुळे शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो व रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन केले. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, बजन नियंत्रनात राहते. रक्तदानामुळे शरिर व मनावर सकारात्मक परिणाम होतो तसेच रक्तदानाचे महत्व, रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवदान मिळते. अनेक मोठया सर्जरीमध्ये व गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यात मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे व आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्वाचे काम करते असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल कोल्हापूर रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय शिराळे यांनी रक्तदान करतेवेळी घ्यावयाची काळजी याबददल मार्गदर्शन केले, तसेच या रक्तदान शिबिरास प्रमुख उपस्थित विभागाचे प्राद्यापक डॉ. के. व्ही. मारुलकर यांनी हुतामा दिनाचे औचित साधून रक्तदान शिबीर याचे देश सेवेमधील योगदान विषद केल. एम. बी. ए. विभागाच्या श्रद्धा शेटके या विद्यार्थिनीने शिबीराचे स्वागत व प्रास्ताविक केले व शिबिरास उपस्थिती मान्यवर व रक्त दात्याचे आभार दिग्विजय माळी या विद्यार्थाने केले. हुतामा दिनी एम. बी. ए. युनिट वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ७६ रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले, यामध्ये एम. बी. ए. विभागातील तसेच विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करुन शिबीरास भरभरुन प्रतिसाद दिला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल, रक्तपेढी कोल्हापूर वैद्यकीय पथक शिबीरात सहभागी झाले. या शिबीराचे आयोजन एम. बी. ए. विभागातील विद्यार्थ्यांनी केले. रक्तदान शिबिराच्या आयोजनसाठी प्रा. डॉ. ए. एम. गुरव, प्र. संचालक, एम. बी. ए. विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विभागातील प्रा. डॉ. दीपा इंगवले, डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे, डॉ. परशुराम देवळी तसेच प्रशासकीय वर्ग व सर्व विध्यार्थी उपस्थित होते. या शिबिरास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी . टी. शिर्के, प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही. एन. शिंदे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…