no images were found
वयोवृद्धांना सक्षम करण्यासाठी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची गेटसेटअप अॅप बरोबर भागीदारी
कोल्हापुर : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने सक्रिय वयोवृद्ध आणि आजीवन शिक्षणासाठी समर्पित असलेल्या गेटसेटअप या अग्रगण्य समुदायासोबत सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. वयोवृद्धांमध्ये स्वातंत्र्य आणि एकूणच त्यांच्या कल्याणाला चालना देणे त्याच बरोबर गेटसेटअपच्या वचनबद्धतेशी सुसंगत राहून त्यांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सामुदायिक सहभागाद्वारे सक्षम करणे हे या सहकार्या मागचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण आणि सामुदायिक संपर्कातून सक्षमीकरण करून ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नवीन कौशल्ये शिकण्यासाठी, इतरांशी जोडण्यासाठी आणि त्यांना नव्या जीवनाची अनुभूती देण्याच्या मिशनसाठी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक एक भक्कम सहयोगी आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून गेटसेटअप वयोवृद्धांसाठी तयार केलेले विशेष वर्ग आणि कार्यशाळांची मालिका सादर करेल. या कार्यक्रमांमध्ये शारिरीक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक परस्परसंवादाला चालना देण्यासाठी सामुदायिक, फिटनेस, प्रवास आणि गायन आणि नृत्य यांसारख्या संवर्धन वर्गांचा समावेश करण्यात येणार आहे.त्यांचा शिकण्याचा अनुभव समृद्ध करण्यासाठी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक तज्ञ वक्ते आणि स्रोत उपलब्ध करून देईल. स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखांमधील रिलेशनशिप मॅनेजर संवाद साधून बँकेकडून देण्यात येत असलेल्या एकात्मिक सेवा आणि सहकार्य यासंदर्भात अधिक जाणून घेऊ शकतात.
या भागीदारी संदर्भात बोलतांना उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोविंद सिंग म्हणाले, “आम्ही गेटसेटअपशी सहकार्य करण्यास उत्सुक आहोत. ही भागीदारी आमच्या सर्वसमावेशक वाढ, आर्थिक सक्षमीकरण आणि समुदाय कल्याणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. आमचे कौशल्य आणि गेटसेटअपचा मंच यांच्या संगमातून आम्ही वयोवृद्धांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रभाव पाडू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.” “गेटसेटअपच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कपिला म्हणाल्या, “उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी करणे हे गेटसेटअपच्या आमच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही एकत्रितपणे त्यांना केवळ शिक्षितच करणार नाही तर आम्ही त्यांना अधिक स्वतंत्र, सक्रिय, सामाजिक आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने, ज्ञान आणि समुदायाच्या पाठिंब्याने सक्षम करत आहोत.”