no images were found
महापालिकेच्या सन 2024-25 अंदाजपत्रकाच्या नियोजनाबाबत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा
कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरीकांना विविध मुलभूत सोई सुविधा पुरविणेत येतात. त्याचबरोबर नागरीकांचे आरोग्यविषयक विविध सुविधा पुरविण्यात येतात. महापालिकेच्यावतीने शहरातील नागरीकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त अनुदान व महापालिकेच्या महसूली उत्पनातून सुविधा पुरविणेसाठी निधी खर्च करण्यात येतो. या सोई सुविधांवरील खर्चाचे अनुषंगाने प्रतीवर्षी महानगरपालिकेचे जमा खर्चाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार केले जाते. या अंदाजपत्रक नियोजनाबाबत प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विविध विभागांचा आज आढावा घेतला. हि बैठक आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये घेण्यात आली. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सन 2023-24 या वर्षातील चालू असलेल्या कामांचा व सन 2024-25 साठी प्रस्तावीत कामांचा आढावा घेतला. यावेळी सर्व विभाग प्रमुखांना सन 2024-25 च्या नविन अंदाजपत्रकासाठी नाविन्यपुर्ण योजना अंदाजपत्रकामध्ये समावेश करावयाचा जमा खर्च तपशील सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे शहरातील नागरीकांच्या अपेक्षा व सूचना द्याव्यात अशा सूचना मुख्य लेखापाल यांना दिल्या.
महानगरपालिकेच्या बजेटबाबत शहारातील नागरीक,सामाजिक संघटना व संस्था यांनी अपेक्षा व सुचना मांडाव्या
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने सन 2024-25 करीता वार्षिक अंदाजपत्रक तयार करणेची कार्यवाही सुरु आहे. त्यास अनुसरून सन 2024-25 चे नविन अंदाजपत्रका बाबत शहारातील नागरिक, सामाजिक संघटना व संस्था यांचेकडून अपेक्षा, सुचना व नविन योजना यांची माहिती मागविण्यात येत आहे. यामध्ये प्राप्त सुचना, योजना व निवेदन तपासून प्राध्यानाने त्याचा समावेश सन 2024-25 च्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराचा सर्वांगिन विकासासाठी नागरीकांचा, सामाजिक संघटनांचा अप्रत्यक्ष सहभागी घेता येणार आहे.
तरी शहरातील सर्व नागरीक/सामाजिक संघटना यांनी आपले बजेट सन 2024-25 करीता आपल्या सुचना/नविन योजना व निवेदने याबाबतची माहिती दिनांक 29 जानेवारी 2024 ते दिनांक 05 फेब्रुवारी 2024 अखेर कार्यालयीन वेळेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालय येथे लिखित स्वरुपात देण्यात यावीत अथवा computerkmc@gmail.com या ई-मेल वर पाठविणेत यावीत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.