Home सामाजिक सेबी अध्यक्षांकडून सीडीएसएलच्या बहुभाषिक उपक्रमांची सुरुवात

सेबी अध्यक्षांकडून सीडीएसएलच्या बहुभाषिक उपक्रमांची सुरुवात

11 second read
0
0
20

no images were found

सेबी अध्यक्षांकडून सीडीएसएलच्या बहुभाषिक उपक्रमांची सुरुवात

कोल्हापूर , : रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करताना आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड अभिमानाने भांडवली बाजार परिक्षेत्रामध्ये सर्वसमावेशकता आणि सुलभतेप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवण्यासाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण बहुभाषिक उपक्रम सुरू करण्याची घोषणा करत आहे. या उपक्रमांचा शुभारंभ सेबीच्या अध्यक्षा श्रीमती माधबी पुरी बुच यांनी रौप्य महोत्सवी कार्यक्रमात केला.गुंतवणूकदारांना २३ वैविध्यपूर्ण भारतीय भाषांमधून त्यांची स्टेटमेंट्स त्यांच्या पसंतीच्या भाषेत प्राप्त करता येण्यासाठी सक्षम करत सीडीएसएल ने गुंतवणूकदार सीएएस मध्ये क्रांतिकारी सुधारणा सादर केल्या आहेत. गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत डिमॅट खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजची एकत्रित माहिती पुरवणारा हा ‘आपका सीएएस – आपकी जुबानी’ उपक्रम सुलभतेची पावती आहे.सीडीएसएल वेबसाइटवर एक वैशिष्ट्यपूर्ण बहु-भाषिक चॅटबॉट, सीडीएसएल बडी सहायता २४*७,’ असून त्याचे उद्दिष्ट ‘आत्मनिर्भरता’ किंवा स्वयंपूर्णतेकडे गुंतवणूकदारांचा प्रवास सुलभ करणे आहे. सध्या सुरूवातीला चार भाषांमध्ये माहिती देऊन चॅटबॉट हा सातत्यपूर्ण सहकारी बनत आहे. आपल्या सिक्युरिटीज मार्केटच्या बारकाव्यांद्वारे मार्गदर्शन करत गुंतवणूकदारांना चोवीस तास सहाय्य प्रदान करतो. सायबर सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांमध्ये बाजारपेठेतील जागरूकता वाढवण्यासाठी सीडीएसएल चे चालू असलेले प्रयत्न देखील सादर करण्यात आले-

     केपीएमजी या नॉलेज पार्टनरच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला हा अहवाल सीडीएसएलच्या नुकत्याच झालेल्या सायबर सिक्युरिटी सिम्पोजियममधील महत्त्वाच्या मुद्दयांचा लेखाजोखा आहे आणि डिजिटल ट्रस्ट, जागतिक आर्थिक परस्परसंबंध आणि उदयोन्मुख सायबर धोक्यांविरूद्ध लवचिकता समजून घेण्यातील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवतो.
      रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेहल व्होरा म्हणाले, “आमच्‍या सर्वसमावेशकतेच्‍या मूल्‍याच्या मार्गदर्शनातून हे नवीन सादरीकरण आमच्यासाठी एक प्रमुख मैलाचा दगड आहे. सर्वसमावेशक विश्वास ही एक प्रेरक शक्ती असून रौप्यमहोत्सवापासून शताब्दी पर्यंत प्रवास करत असताना सीडीएसएलची तो मुख्य मूल्यसिद्धांत आहे. सर्वसमावेशक विश्वास निर्माण करण्यासाठी आणि उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करणे आहे ही आमची आकांक्षा आहे.
     प्रत्येक गुंतवणूकदाराला समान रीतीने सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे, प्लॅटफॉर्मवर सुरक्षित प्रवेश मजबूत करणे किंवा प्रभावी आर्थिक शिक्षण आणि भाषेतील अडथळ्यांच्या पलीकडे असलेल्या साधनांद्वारे स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी गुंतवणूकदारांना सक्षम बनवणे अशी कोणतीही गोष्ट असली तरी आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. संयुक्त सीडीएसएलची कल्पना करत आम्ही फक्त एकच भाषा बोलतो ती म्हणजे सर्वसमावेशक विश्वासाची. तिथे आमची मूल्ये एकसंध विश्वासाशी सुसंगत असतात.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…