no images were found
ध्येय निश्चित केल्यास आयुष्याचा प्रवास सुखकर – कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के
कोल्हापूर – विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी वक्तशीरपणा आणि शिस्त अंगीकारली पाहिजे. इतरांपेक्षा वेगळे बनण्यासाठी वाचन कौशल्य वृध्दीगंत करावे. त्याचबरोबर, सर्वात महत्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित केल्यास आयुष्याचा प्रवास सुखकर होतो, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी
आज येथे केले.
विद्यापीठ परिसरामधील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि विदेशी भाषा अधिविभागांमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि प्रशासनातील अधिकारी यांचा संवाद घडवून आणण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 इंडक्शन प्रोग्रामाचे आयोजन राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षीय
स्थानावरून कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के पुढे बोलताना म्हणाले, या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत बी.ए.स्पोटर्स हा अभ्यासक्रम विद्यापीठ परिसरामध्ये सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर, बी.ए.फिल्म मेकींग हा अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. मुख्य अभ्यासक्रमाबरोबरच अन्य चांगले उपक्रम विद्यार्थ्यांना करण्यासारखे आहेत. विद्यापीठ परिसर स्वच्छ, संुदर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी एनएसएस विभागामार्फत प्रयोगशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. प्रगतीचा ध्यास घेवून उच्च पातळीवर जाण्यासाठी विद्यार्थी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजेत. विद्यापीठामध्ये सुसज्ज ग्रंथालये, विस्तीर्ण क्रीडा परिसर, प्रशस्त वसतीगृहे, मनमोहक हिरवीगार वनराई, शुध्द हवा, स्वच्छ आणि सुंदर परिसर विद्यार्थ्यांनी अध्ययनाकरिता अतिशय पोषक वातावरण उपलब्ध आहे. विद्यापीठामध्ये वेळोवेळी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती करून घेतली पाहिजे. आजीवन अध्ययन केंद्र, संगीत अधिविभागामध्ये शिकविल्या जाणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांचीही माहिती घेवून
सहभागही घेतला पाहिजे.