
no images were found
महापालिकेच्या संकेतस्थळावर 2015 ते 2020 अखेरचे सर्व इतिवृत व 2023 अखेरचे उपसमितीचे सर्व ठराव प्रसिद्ध
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ दि.०१ मे २०२३ रोजी करण्यात आलेला आहे. या नवीन संकेतस्थळावर नागरिकांना महानगरपालिकेची विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 2015 पासून 2020 अखेरचे वेळोवेळी झालेले महासभेचे, स्थायी समितीचे इतिवृत व प्रशासन कालावधीतील उपसमितीचे ठराव नागरीकांना ऑनलाईन पाहण्याठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
हि सर्व माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचा संकेतस्थळ https://web.kolhapurcorporation.gov.in वर होस्ट करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेचे व स्थायी समिती सभेचे सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या कालावधीतील इतिवृत प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच नोव्हेंबर २०२० नंतर महानगरपालिकेत महासभा अस्तित्वात नसलेने प्रशासक कालावधी सुरू झालेला आहे. या प्रशासक कालावधीत महानगरपालिकेत प्रशासकीय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या उपसमितिद्वारे विविध विषयांवर रीतसर चर्चा होऊन प्रशासक यांचे मान्यतेने ठराव करण्यात येतात. या प्रशासकीय उपसमितीचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीतील विविध विषयांचे मंजूर झालेले ठराव या नवीन संकेतस्थळावर प्रकाशने या मेनूमध्ये नागरीकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.