Home क्राईम आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

0 second read
0
0
146

no images were found

आमचं प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सोलापूर :  आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलांनी आपले जीवन संपवले. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षीच गणेश विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेले वाजीद चांद इनामदार अशी प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी 7 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

या दोघांनी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… म्हणून हे कृत्य आम्ही करत आहोत, याबाबत कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…