no images were found
पुष्पा इम्पॉसिबल 500 भागांच्या पूर्ततेकडे
आपले प्रभावी कथाकथन आणि प्रासंगिक मजकूर प्रेक्षकांना देण्यासाठी वचनबद्धतेसाठी सोनी सब प्रख्यात आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या ‘पुष्पा इम्पॉसिबल’या यशस्वी मालिकेच्या माध्यमातून सोनी सबने प्रेक्षकांना प्रेरित करणे कायम सुरू ठेवले आहे. ही मालिका तिच्या ऐतिहासिक 500 व्या एपिसोडपर्यंत पोहोचली आहे. सोनी सब अभिमानाने मालिकेतील मध्यवर्ती भूमिका पुष्पाच्या प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे. प्रतिभावंत अभिनेत्री करूणा पांडेययांनी पुष्पाची भूमिका साकारली आहे.
पुष्पाची व्यक्तिरेखा ही आनंदी वृत्तीचे दुसरे नाव आहे. अभेद्य दृढसंकल्प आणि साहसी भावनेसोबत ती ‘कधीही हार न मानण्याचा’ वृत्तीने आयुष्यातील आव्हानांचा सामना करत असते. एकल मातेच्या अथकपणे यशाचा पाठलाग करण्याच्या चित्रणासाठी या मालिकेवर प्रचंड प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव झाला आहे. आपले कुटुंब आणि समुदायाप्रती वचनबद्धतेसह ही मालिका सर्वच प्रकारच्या लोकांशी तादात्म्य साधत आहे. तिने ज्या आव्हानांवर मात केली आणि विजय मिळवला आहे, त्याचेच प्रतिबिंब उमटवत पुष्पाचा जीवनप्रवास हा आपल्या मनात असलेल्या सामर्थ्याचीच पोचपावती आहे. यातून तिने साहसी वृत्तीने बिकट संकटांचा सामना करण्यासाठी प्रेक्षकांनाही प्रेरित केले आहे.
करुणा पांडेय पुष्पा पटेलच्या भूमिकेत
“माझी व्यक्तिरेखा पुष्पा पटेलला प्रेक्षकांनी ज्या प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करते. 500 एपिसाेड्सचा हा प्रवास भावनांच्या रहाटपाळण्यावर झुलवणारा ठरला. हा मैलाचा दगड गाठण्याचा उत्सव साजरा करत असताना मी कृतज्ञतेच्या भावनेत बुडून गेले आहे. एक अत्यंत जवळीकता वाटणारे पात्र – पुष्पा ही सामर्थ्य, आनंदी वृत्ती आणि मानवी भावनांच्या विजयाचे एक प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभे राहते. मालिकेचा प्रत्येक भाग हा आमचा आणि प्रेक्षकांचा सामायिक विजयच आहे. या पुढेही पुष्पाची कहाणी पडद्यावर चितारणे कायम ठेवण्यासाठी मी खूप उत्सूक आहे. नवनवीन आव्हानांना साद घालणे, दृढनिश्चय आणि साहसी वृत्तीने आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामाेरे जाण्यास प्रेक्षकांना प्रेरित करण्यासाठी मी आतूर आहे.”