Home शासकीय जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

53 second read
0
0
24

no images were found

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

 

        कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील दि. 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी पायी दिंडी काढून मुंबई येथे आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील मराठा आरक्षणातील पक्ष, संघटना या आंदोलनास पाठिंबा देणार आहेत, तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी रात्रौ 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्याच्या संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.                                                                     

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…