
no images were found
CBI चे देशात 33 ठिकाणांवर छापे
जम्मू आणि काश्मीर पोलीस भरती घोटाळ्या संदर्भात देशभरात 33 ठिकाणी सीबीआयची छापासत्र सुरू आहे. हे छापे J&K SSB चे अध्यक्ष खालिद जहांगीर आणि कंट्रोलर अशोक कुमार यांच्यासह इतर काही जणांच्या ठिकाणांवर सुरू आहे. जम्मूमध्ये 14, श्रीनगरमध्ये 1, हरियाणात 13 आणि गुजरातमधील गाझियाबाद, बेंगळुरू आणि गांधीधाममध्ये प्रत्येकी एका ठिकाणावर ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आगे. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस, डीएसपी आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात येत आहेत.
J&K पोलीस भरती घोटाळा : जम्मू आणि काश्मीर उपनिरीक्षक भरतीची परीक्षा 27 मार्च 2020 रोजी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 97000 उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर या भरती परीक्षेचा निकाल 4 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये 1200 उमेदवार उत्तीर्ण झाले. मात्र, परीक्षेत हेराफेरीच्या तक्रारींनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सीबीआयकडून ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीर सब इन्स्पेक्टर भरती घोटाळ्यात 30 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. 5 ऑगस्ट रोजी जम्मूमधील 28, श्रीनगर आणि बंगळुरूमधील प्रत्येकी एका ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. जम्मू-काश्मीर उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून आजपर्यंत 33 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.