no images were found
टाटा ऍसेट मॅनेजमेंटने प्रस्तुत केल्या चार नवीन फंड ऑफर्स
मुंबई : टाटा ऍसेट मॅनेजमेंटने चार नवीन योजना सुरु केल्याची घोषणा केली आहे, यातील दोन एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि दोन फंड ऑफ फंड (एफओएफ) आहेत.:
टाटा गोल्ड ईटीएफ हा ओपन एंडेड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे जो सोन्याच्या देशांतर्गत किमतीला रेप्लिकेट/ट्रॅक करतो. एनएफओ २ जानेवारी २०२४ ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत खुली राहील. टाटा गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड योजना आहे जी टाटा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करते. एनएफओ २ जानेवारी २०२४ ते १६ जानेवारी २०२४ पर्यंत खुली राहील. टाटा सिल्वर ईटीएफ एक ओपन एंडेड एक्स्चेंज ट्रेडेड फंड आहे जो चांदीच्या देशांतर्गत किमतीला रेप्लिकेट/ट्रॅक करतो. एनएफओ २ जानेवारी २०२४ ते ९ जानेवारी २०२४ पर्यंत खुली राहील. टाटा सिल्वर ईटीएफ फंड ऑफ फंड एक ओपन एंडेड फंड ऑफ फंड स्कीम आहे जी टाटा सिल्वर एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करते. एनएफओ २ जानेवारी २०२४ ते १६ जानेवारी २०२४ पर्यंत खुली राहील.
आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यासाठी आणि पोर्टफोलिओ दीर्घकाळपर्यंत स्थिर रहावा यासाठी आकर्षक धोरण प्रस्तुत करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सोने व चांदीमध्ये गुंतवणूक केली जाते. चलन अवमूल्यन, महागाई आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यापासून बचाव करण्याबरोबरीनेच, सोन्याची कमतरता व सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचा पूर्वापारपासूनचा दृष्टिकोन यामुळे सोने तुमच्या संपत्तीला प्रभावी पद्धतीने सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकते. चांदीचा पुरवठा कमी असताना देखील, ईव्ही तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यासारख्या उद्योगक्षेत्रांमध्ये चांदीची वाढती मागणी किमतींमध्ये संभाव्य वाढीचे संकेत देते. चांदी हे एक उप-उत्पादन आहे, कमतरता आणि वाढता औद्योगिक उपयोग यामुळे चांदी हा एक आकर्षक गुंतवणूक पर्याय बनला आहे. व्यवहारांचा कमी खर्च, अधिक लिक्विडीटी आणि कमी एक्स्पेन्स रेशो यासारखी वैशिष्ट्ये असलेला संपत्ती वर्ग म्हणून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी हे फंड्स गुंतवणूकदारांना मिळवून देतील.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटमध्ये इन्स्टिट्यूशनल क्लायंट्स, बँकिंग, अल्टरनेट इन्वेस्ट्मेन्ट्स आणि प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीचे बिझनेस हेड श्री आनंद वरदराजन यांनी सांगितले, “जर धोके माहिती नसतील तर वैविध्य आणा. जेव्हा धोके माहिती असतील तेव्हा स्वतःचा बचाव करा. सोने आणि चांदी यासारखे मौल्यवान धातू गुंतवणूकदारांना धोक्यांपासून सुरक्षित राहण्यात मदत करतात आणि पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणतात. महागाई आणि चलनामधील उतारचढावांपासून बचाव करण्याची क्षमता मिळते, तसेच वेगळ्या पद्धतीने सह-संबंधित असल्यामुळे इक्विटी व डेट मार्केट्सच्या अनिश्चिततांपासून सुरक्षित राहण्याची जागा याठिकाणी मिळते. जमिनीखालून जास्तीत जास्त सोने काढण्यात आले असून आता तिथे खूपच कमी सोने उरले आहे ही बाब जर खरी असेल तर सोने ही अतिशय मौल्यवान संपत्ती आहे. मर्यादित पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असलाच पाहिजे.
चांदीचा उपयोग दागिने, सजावट आणि औद्योगिक क्षेत्रात देखील केला जातो. अनेक नवीन उद्योगक्षेत्रांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. चांदीला रायजिंग मेटल म्हटले जाणे ही काही आश्चर्यकारक बाब नाही. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने आणि चांदी हे दोन्ही वैविध्यामधील संतुलन व बचाव मिळवून देत एक उत्तम वाटप ठरू शकतात.