Home सामाजिक जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ

16 second read
0
0
64

no images were found

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ

 

               कोल्हापूर  : जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्यास 7 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी व प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवाराचे नामांकन करण्याच्या दृष्टीने विविध आस्थापनाच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा (स्किल कॉम्पिटीशन) आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने एनएसडीसी कडून ऑनलाईन नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. “जागतिक कौशल्य स्पर्धा 2024” करिता इच्छुक पात्र उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या लिकंवर 7 जानेवारी 2024 पर्यत नोंदणी करावी, असेही  पत्रकात म्हटले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…