
no images were found
मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
कोल्हापूर : भा
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात पुढील सुधारणा केल्या असून सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे – दावे व हरकती निकाली काढणे – सध्याचा कालावधी– दि. २६ डिसेंबर २०२३ पर्यंत (मंगळवार), सुधारित कालावधी -१२ जानेवारी २०२४ (शुक्रवार). मतदार यादीचे हेल्थ पॅरामीटर तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे व डेटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी यादीची छपाई करणे- सध्याचा कालावधी -दि. 1 जानेवारी 2024 पर्यत (सोमवार), सुधारित कालावधी- 17 जानेवारी 2024 (बुधवार) अंतिम प्रसिध्दी- सध्याचा कालावधी -दि. 5 जानेवारी 2024 पर्यत (शुक्रवार), सुधारित कालावधी- 22 जानेवारी 2024 (सोमवार) याप्रमाणे असणार आहे.