no images were found
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 7 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करा
कोल्हापूर : ल्योन, फ्रांस येथे सन 2024 मध्ये आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी 7 जानेवारी 2024 पर्यंत https://kaushalya.mahaswayam.
सन 2024 मधील ल्योन, फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न उमेदवारांचे मानांकन करण्याच्या दृष्टिने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये एमएसएमई टूल रुम्स, सीआयपीईटी, आयआयटी, महाराष्ट्र स्टेट स्किल युनिर्व्हसिटी, एमएसबीव्हीईटी, प्रायव्हेट स्किल युनिर्व्हसिटी, फाईन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इस्न्टिट्युट, इस्न्टिट्युट ऑफ ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत –
जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा यानंतरचा असणे अनिवार्य आहे. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरींग, क्लाऊड कॉम्प्युटींग, सायबर सिक्युरीटी, डिजिटल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फर्मेशन नेटवर्क गॅबलिंग, मेकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टिम इंटिग्रेशन ॲण्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा यानंतरचा असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा 0231-2545677 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.