no images were found
खरगेंच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर शरद पवार नाराज?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. आघाडीची नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीत यावर चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपाला आव्हान देण्याची इंडी आघाडीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. इंडी आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि आघाडीतल्या अनेक पक्षांचा त्यास पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी खरगेंच्या नावाचा विचार सुरू झाल्याने आघाडीतल्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील नाराज असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
इंडिया अघाडीच्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी जुनं उदाहरण दिलं. शरद पवार म्हणाले, “१९७७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळीदेखील असं म्हटलं जात होतं की, विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे ठरलं नाही. पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नाही तर निवडणुकीचे निकाल विरोधात लागतील. परंतु, तसं झालं नाही. जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात.