no images were found
पर्यावरणपूरक व पर्यावरण संवर्धन या विषयावरील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस
कोल्हापूर :- आंतरराष्ट्रीय “ओझोन डे” दिनानिमित्त पर्यावरणपूरक व पर्यावरण संवर्धन या विषयावर महापालिका, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण व विवेकानंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आला होत्या. हि स्पर्धा दि.16 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आली. या चित्रकला स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला.
यामध्ये 1 ली ते 4 थी गट शाळेतील चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजयादेवी घाटगे स्कूलचा अनमोल पोतदार याने पटकाविला. त्याला रोख रक्कम रु.3000/- व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक नेहरु विद्यालयाची विद्यार्थीनी शर्वरी कुंभार हिने पटकाविला. तिला रोख रक्कम रु.2000/- व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक विद्यापीठ मराठी शाळेचा शौर्य पवार याने पटकाविला. त्याला रोख रक्कम रु.1000/- व प्रशस्तीपत्र व उत्तेजनार्थ छत्रपती शाहू विद्यालयाची विद्यार्थींनी स्वरा साखरे, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचे रकिशा खरतमोल, चाटे स्कूलचे दुर्वा पाटील, लोकमान्य विद्यालयाचे रुचीकुमार वडार यांनी पटकाविला. यांना रोख रक्कम रु.500/- व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
5 वी ते 7 वी गटामध्ये प्रथम क्रमांक टेंबालाईवाडी विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत सोले यास रोख रक्कम रु.3000/- व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक महात्मा फुले विद्यालयाचा विद्यार्थी अनिरुध्द पानारी यास रोख रक्कम रु.2000/- व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक विद्यापीठ हायस्कूलचा विद्यार्थी आयुष्य सातारकर हिला रोख रक्कम रु.1000/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ उषाराजे हायस्कूलची विद्यार्थीनी वेदिका ढेकळे, बोंद्रेनगर विद्यालयाचा विद्यार्थी जिशासन चाऊस, जरगनगर विद्यामंदीरची विद्यार्थींनी श्रेया मोरे, विद्यापीठ हायस्कूलची विद्यार्थीनी धनू टोपापे व श्रध्दा बहिरशेठ यांना रोख रक्कम रु.500/- व प्रशस्तीपत्रे देण्यात आले.
8 वी ते 10 वी गटामध्ये प्रथम क्रमांक उषाराजे हायस्कूलची विद्यार्थीनी श्रुती लाड यास रोख रक्कम रु.3000/- व प्रशस्तीपत्र, द्वितीत क्रमांक तवनाप्पा पाटणे हायस्कूलची विद्यार्थींनी मानसी पवार यास रोख रक्कम रु.2000/- व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक विद्यापीठ हायस्कूलचा विद्यार्थी महम्मदसाद पट्टेकरी यास रोख रक्कम रु.1000/- व प्रशस्तीपत्र, उत्तेजनार्थ ऊर्दु हायस्कूलची विद्यार्थी आरीफा मुल्ला, पब्लिक स्कूलची युविका रजनवरे, विद्यापीठ हायस्कूलचा मिहिर चौगुले, पुष्कर सोनार, तवनाप्पा पाटणे हायस्कूलची गायत्री शिंदे यांना रोख रक्कम रु.500/- व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
तसेच कॉलेज गटामधील चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डी.डी.शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थीनी अरुणीमा संतोष विव्दांस व विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी प्रतिक मनोज जमदम्नी याने पटकाविला. त्यांना रोख रक्कम रु.5000/- व प्रशस्तीपत्र देण्यात आले. द्वितीय क्रमांक क्रमांक डी.डी.शिंदे सरकार कॉलेजची विद्यार्थीनी यशाया बिरणे व विवेकानंद कॉलेजची विद्यार्थीनी वसिमा मन्सुर देसाई यांनी पटकाविला. त्यांना रोख रक्कम रु.3500/- व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांक विवेकानंद कॉलेजची कॉलेजची विद्यार्थीनी अमेया शाहुकुमार कांबळे व शाहू कॉलेजची विद्यार्थींनी आदिती सुर्याजी पाटील यांनी पटकाविला. त्यांना रोख रक्कम रु.2500/- व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर उत्तेजनार्थ न्यू मॉडेल ज्युनि. कॉलेजची विद्यार्थीनी रिषीता सागर म्हापसेकर, विवेकानंद कॉलेजची विद्यार्थींनी वैष्णवी धनंजय चव्हाण, मेन राजाराम ज्युनि.कॉलेजची विद्यार्थिनी सरोजनी बाबासो पाटील, शाहू कॉलेजची विद्यार्थीनी संचिता आनंदा कांबळे, वाय.सी.पॉलिटेक्नीक कॉलेजचा विद्यार्थी सृजन राजकुमार माने यांनी पटकाविला. या सर्वांना रोख रक्कम 1000/- व प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासनाधिकारी एस.के.यादव, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर नगररचना रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आस्थापना अधीक्षक राम काटकर, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, अग्निशमन दलाचे जवान, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते