Home शासकीय नगररचना विभागाकडून आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 51 बांधकाम परवानग्या

नगररचना विभागाकडून आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 51 बांधकाम परवानग्या

12 second read
0
0
24

no images were found

नगररचना विभागाकडून आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 51 बांधकाम परवानग्या

 

 

कोल्हापूर  : नगररचना विभागामार्फत आयोजित दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 51 बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. गुरुवारी या कॅम्पमध्ये 19 बांधकाम परवानग्या, 17 भोगवटा प्रमाणपत्र, 7 विभाजन व 10 अनामत रक्कमांना मान्यता देण्यात आली. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. नगररचना विभागामार्फत दोन दिवसात 51 बांधकाम परवानग्या, 34 भोगवटा प्रमाणपत्र, 11 विभाजन, 5 बांधकाम परवानगीला मुदतवाढ व 11 अनामत रक्कमांना मान्यता देण्यात आली.

           या कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना विनय झगडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिक व आर्किटेक्चर यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…