
no images were found
ऑटो टीपर ड्रायव्हर पुरवठा एजन्सी वर होणार ब्लॅक लिस्ट ची कारवाई
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या समोर ऑटो टीपर ड्रायव्हरना किमान वेतन मिळण्याबाबत काही संघटनांनी धरणे आंदोलन केलेले आहे. परंतू ऑटो टीपर ड्रायव्हरना वेतन देण्याची जबाबदारी डीएम एंटरप्राइजेस व शिवकृपा या एजन्सीची आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात ऑटो टिप्पर वर नेमलेले ड्रायव्हर हे महानगरपालिकेचे कर्मचारी नसून ते डीएम एंटरप्राइजेस व शिवकृपा या दोन एजन्सीचे ड्रायव्हर आहेत. त्यांच्या वेतनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपन्यांची आहे. महानगरपालिकेला ड्रायव्हर पुरविण्यासाठी या दोन कंपन्यांनी निविदा भरलेली आहे. या निविदेमध्ये त्यांनी ड्रायव्हरची रक्कम स्वत: निविदेद्वारे भरलेली आहे. त्यामुळे त्यांच्या ड्राव्हरांचा वेतनाचा प्रश्न हा संबंधित दोन कंपन्यांचा आहे.
काही संघटनांनी बेकायदेशीरपणे ऑटो टिप्पर चालकांचा बंद केलेला आहे. तथापि आरोग्य व्यवस्था ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे संबंधित कंपनीने ड्रायव्हरचा पुरवठा दैनंदिन करणे आवश्यक आहे. जे ड्रायव्हर अत्यावश्यक सेवेसाठी येणार नाहीत अशा ड्रायव्हरांना भविष्यात महानगरपालिकेच्या कोणत्याही गाडीवर कामासाठी घेतले जाणार नाही. तसेच संबंधित दोन्ही कंपन्यांची अनामत रक्कम जप्त करुन त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट करण्याची सक्त कारवाई केली जाईल अशी भूमिका महानगरपालिकेची आहे.तसेच शनिवारी काम बंद कालावधीमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी व इतर एजन्सी चे कर्मचारी घेऊन आरोग्यासाठी ड्रायव्हर उपलब्ध करून घेवून काम सुरू करणेत आलेले आहे. यामध्ये 28 ॲटो टिप्पर, 22 ट्रॅक्टर अशा 50 वाहनाद्वारे कचरा उठावाचे काम सुरु आहे. तरी कोणत्याही ड्रायव्हरने बेकायदेशीरपणे काम बंद करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.