Home शासकीय विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येक गावागावात पोहचून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश –  धनंजय महाडीक

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येक गावागावात पोहचून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश –  धनंजय महाडीक

36 second read
0
0
41

no images were found

विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येक गावागावात पोहचून लाभार्थ्यांना लाभ देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश –  धनंजय महाडीक

 

कोल्हापूर  : विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येक गावागावात पोहचून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश असलेचे खासदार धनंजय महाडीक यांनी सांगितले. शहरात या विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ राजारामपुरी येथील 9 नंबर शाळेच्या ग्राऊंडवर खासदार धनंजय महाडीक व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेत दि.9 ते 19 डिसेंबर 2023 अखेर महापालिकेच्यावतीने केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, उपशहर अभियंता सतीश फप्पे, रमेश कांबळे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे शहराध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारी सदस्य राहूल चिकोडे, माजी नगरसेवक दिपक जाधव, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, सौ.भाग्यश्री शेटके व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

            यावेळी खासदार धनंजय महाडीक यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनसामान्यांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी ही भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. यासाठी गावोगावी 12 व्हॅनवर स्क्रिनद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. केंद्र शासनामार्फत महिलांना उज्जवल गॅस योजनेद्वारे गॅस पुरवठा करण्यात येत असून पाण्यासाठी हर घर नळ योजना राबविण्यात येत आहे. किसान सन्मानासाठी शेतकऱ्यांसाठी जनधन खात्याची सुरवात करण्यात आली असून केंद्र शासनाने आजपर्यंत आणलेल्या ज्या काही योजना आहेत. त्या योजनेपासून जे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहचविण्यासाठी ही संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.

            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना महापालिकेमार्फत केंद्र शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. यातील पी.एम.स्वनिधीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने 109 टक्के उद्दिष्ट पुर्ण करुन राज्यात कोल्हापूर महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकाविला आहे. तसेच आयुष्यामान भारत योजनेअंतर्गत शहरात 93 हजार कार्डचे वितरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन, पी.एम. ई बस सेवा, खेलो इंडिया, मुद्रा लोन असो  यामध्ये आपण राज्यात चांगले काम करु. दि.19 डिसेंबर 2023 पर्यंत महापालिकेच्या हद्दीतील विविध भागात या संकल्प यात्रेद्वारे जास्तीत जास्त केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ देण्यात येणार आहे.  

            यावेळी उपस्थित लाभार्थी शाहूनगर येथील मंगल शिवाजी चव्हाण यांनी आपल्याला केंद्र शासनाच्या उज्वल गॅस योजनेद्वारे लाभ मिळाला असलेचे मनोगत व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुद्रे यांनी केले.

            रविवार, दि.10 डिसेंबर 2023 रोजी संभाजीनगर व कसबा बावडा, दि.11 डिसेंबर 2023 रोजी कळंबा व महालक्ष्मी मंदीर (भवानी मंडप), दि.12 डिसेंबर 2023 रोजी सुभाषनगर  व आर के नगर, दि.13 डिसेंबर 2023 रोजी एसटी स्टॅण्ड व सायबर चौक, दि.14 डिसेंबर 2023 रोजी सोन्यामारुती चौक व गंगावेश, दि.15 डिसेंबर 2023 रोजी रंकाळा तलाव व सदरबाजार, दि.16 डिसेंबर 2023 रोजी सासने मैदान व शाहू मार्केट यार्ड, दि.17 डिसेंबर 2023 रोजी फुलेवाडी व उभा मारुती चौक, दि.18 डिसेंबर 2023 रोजी नागाळा पार्क व रमणमळा चौक, दि.19 डिसेंबर 2023 रोजी हुतात्मा पार्क चौक व उद्यमनगर याठिकाणी ‍व्हॅनवर स्क्रिनद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…