
no images were found
‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’वर आज विद्यापीठात कार्यशाळा
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभाग तसेच पद्मश्री डॉ. ग. गो जाधव पत्रकारिता अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्क्रिप्ट टू स्क्रीन या विषयावर शनिवार दि. 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
पुणे येथील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पडद्यामागची गोष्ट या पुस्तकाचे लेखक सुनील नाईक कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
ही कार्यशाळा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या नवीन इमारतीमध्ये होत आहे.
कार्यशाळा निशुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. यात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.