no images were found
सावरकर यांचा अपमान करणाऱ्या खरगेंचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध..!
इंचलकरंजी(प्रतिनिधी): जन्मजात देशभक्त, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रिय समाज सुधारक अशा अनेक उपमा देऊ केलेल्या असे भारताचे आद्य क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारवंत, थोर समाज सुधारक, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याविरुद्ध एक-दोन वेळा नव्हे तब्बल कित्येक वेळा आक्षेपार्य विधान करणारे मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियंक खरगे यांच्या प्रतिमेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, जयेशदादा बुगड यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले .त्यावेळी *स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान,नही सहेगा हिंदुस्तान व सावरकर के सन्मान में युवा मोर्चा मैदान में अशा घोषणा जयेश दादा बुगड यांनी दिल्या. तेव्हा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुशांत पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अरविंद माने, रवी घोरपडे, अरविंद चौगले, प्रवीण पाटील, उमाकांत दाभोळे, राजू भाकरे, नामदेव सातपुते, मनोज तराळ, प्रवीण बनसोडे, सुधाकर हेब्बाळे, श्रेयश गट्टानी, अमित जावळे, प्रदीप माळगे, मयूर दाभोळकर, आशिष खंडेलवाल, केतन घोरपडे, नितीन पडियार, हेमंत वरुटे, तानाजी भोसले, अर्जुन शिंदे, कुमार शिंदे, केतन जावळे, सचिन कोरे, आप्पा रावळ, श्याम वरुटे, नितीन आरगे, ओंकार बुरंडे, विश्वास माने, सयाजी काटकर, राजदीप सावंत, अक्षय शेटे, प्रदीप गायकवाड, सुहास जाधव, प्रवीण रांगोळे, कृष्णा पाटील. इत्यादी सर्व भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.