no images were found
तरुणानं एकाच वेळी केलं ४ मुलींशी लग्न!
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे अर्थातच प्रत्येक जण लग्न करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. आपल्या होणाऱ्या पार्टनरची चौकशी करतात. दोघांच्या आवडीनिवडी जुळतायेत का? याचा विचार करतात. पण काही काही लग्न पाहिल्यानंतर मात्र अवाक् व्हायला होतं. ही मंडळी एकत्र राहाणार कशी अशा विचार डोक्यात येतो. अन् असंच एक लग्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण हा नवरदेव एकाच वेळी तब्बल ४ मुलींशी लग्न करतोय. आमचं एक लग्न होत नाहिये अन् हा व्यक्ती ४ मुलींशी लग्न करतोय, तर कोणी म्हणतेय, हे लग्न म्हणजे जगातील आठवं आश्चर्य आहे. तर काहींना प्रश्न पडलाय या चौघींना तो सांभाळणार कसा? आता हे लग्न नेमकं झालं कुठे आणि कधी? याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.