Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभाचे डॉ. एस.एस. मंथा प्रमुख पाहुणे; राज्यपाल रमेश बैस अध्यक्ष

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभाचे डॉ. एस.एस. मंथा प्रमुख पाहुणे; राज्यपाल रमेश बैस अध्यक्ष

5 second read
0
0
34

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या ६०व्या दीक्षान्त समारंभाचे

डॉ. एस.एस. मंथा प्रमुख पाहुणे; राज्यपाल रमेश बैस अध्यक्ष

कल्हापूर, ( प्रतिनीधी ) : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षान्त समारंभ येत्या १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (ए.आय.सी.टी.ई.) या राष्ट्रीय नियामक संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एस.एस. मंथा उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती डॉ. रमेश बैस उपस्थित राहणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी असतील. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली.

डॉ. शंकर एस. मंथा यांनी त्यांच्या सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत शैक्षणिक व नागरी प्रशासन क्षेत्रातील अनेक सन्मानाची पदे भूषविली आहेत. त्यांनी मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. संस्थेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व कंट्रोल थिअरी या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्याखेरीज, आय.बी.एम., पॉकिप्सी (न्यूयॉर्क) या अमेरिकन कंपन्यांमध्येही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून त्यांचे २८०हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक परिषदांत त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत, बीजभाषणे दिली आहेत. तीन पुस्तकेही त्यांनी लिहीली आहेत. ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ (एनएसक्यूएफ) आणि ‘ब्लेंडेड लर्निंग’ नियमावलीचे ते उद्गाते आहेत. कर्नाटक स्कील डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे ते सदस्य आहेत आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागारही आहेत.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि के.एल. विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाप्रीत स्टार्टअप नॉलेज सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड स्टडीज्, बेंगलोर या संस्थेत अॅडजंक्ट प्राध्यापक, नॅशनल सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी स्टॅंडर्ड्स (एनसीएसएसएस) संस्थेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन आणि महाराष्ट्र शासनासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून काम पाहात आहेत.

दरम्यान, या दीक्षान्त समारंभात प्रदान करण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांची संख्या ही ४९,४३८ इतकी आहे, हे सांगताना मला आनंद होतो आहे. यंदा पदवी ग्रहण करणाऱ्या स्नातकांत मुलींची संख्या २७,४७५ इतकी लक्षणीय आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर,  कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यां…