
no images were found
गौतम अदानी यांना एका दिवसात १.९२ लाख कोटींचा फायदा !
तीन राज्यांतील निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यानंतर याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. दरम्यान, अदानी समूहाच्या शेअर्समध्येही तुफान वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २०-२० टक्क्यांनी वाढ झाली. यासह अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ११ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे.मंगळवारी ट्रेडिंग दरम्यान अदानी समूहाचे बाजार भांडवल १३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. अदानी समूहानं एका दिवसात आपल्या मार्केट कॅपमध्ये १.९२ लाख कोटी जोडून आपला आतापर्यंतचा सर्वात्कृष्ट सिंगल डे मार्केट परफॉर्मन्स दाखवलाय. यासह, गौतम अदानी ७०.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १६ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
शेअर्समध्ये तुफान तेजी मंगळवारी आल्याने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली