Home सामाजिक वार्डविझार्ड तर्फे आयोजित बिझनेस जत्रेला उत्स्फूर्त  प्रतिसाद

वार्डविझार्ड तर्फे आयोजित बिझनेस जत्रेला उत्स्फूर्त  प्रतिसाद

12 second read
0
0
42

no images were found

वार्डविझार्ड तर्फे आयोजित बिझनेस जत्रेला उत्स्फूर्त  प्रतिसाद

 

कोल्हापूर  – वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेड या कंपनीने १ आणि २ डिसेंबर रोजी ठाणे येथे आयोजीत केलेल्या प्रतिष्ठित ‘लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३’ ची चमकदार कामगिर केली. कार्यक्रमाचे सह आयोजक असलेल्या क्विक शेफ ने कंपनीचे नाविन्य, शाश्वतता आणि खाद्यपदार्थ व पेय या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावण्याचे आश्वासन दिले आहे.लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशीप अँड एक्सलन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस जत्राच्या माध्यमातून या क्षेत्रातील लीडर्स, उद्योजक आणि भागधारकांना एमएसएमई क्षेत्रातील चिकाटी व नाविन्याची दखल घेण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला. 

वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शीतल भालेराव म्हणाल्या, ‘लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ मधील आमचा सहभाग सुफळ ठरला. वेगवेगळे भागधारक, वितरक, रिटेलर्स आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय भागिदारांबरोबर संवाद साधण्याची संधी आम्हाला इथे मिळाली. कंपनीच्या वेगवेगळ्या स्टॉल्सवर येणाऱ्या ग्राहकांचे विविध उत्पादनांच्या विस्तारण श्रेणीने लक्ष वेधून घेतले जात होते. त्यामध्ये क्विकशेफची रेडी-टु-इट मील्स, सॉसेस आणि मसाले तसेच स्नॅक बडीची होरेका श्रेणी यांचा त्यात समावेश होता. 

या प्रदर्शनादरम्यान ग्राहकांनी पदार्थांची चव घेण्यास भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना कंपनीची दर्जेदार उत्पादने जसे की आरईटी मील्स, सॉसेस आणि फ्रोझन पदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळाला. यामुळे  ग्राहकांना वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसच्या उत्पादनांचे वैविध्यपूर्ण स्वाद आणि उच्च दर्जा यांची अनुभूती घेता आली. वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या उत्पादन श्रेणीमध्ये  दर्जेदार घटक साहित्य वापरले जात असल्याचे नमूद केले. पदार्थांची चव घेण्यातून ग्राहकांना कंपनीच्या आंबटगोड सॉसेसपासून चविष्ट रेडी-टु-इट व फ्रोझन मील्सपर्यंतची विस्तृत श्रेणी, बारकाईने तयार करण्यात आलेली त्याची चव अनुभवता आली.

यामध्ये ताजे, स्थानिक पातळीवर मिळणारे घटक पदार्थ तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग प्रामुख्याने यावर भर देत वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस जबाबदारपणे खाद्य पदार्थांची निर्मिती करण्याचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे आणि अधिक शाश्वत जीवनासाठी मार्ग तयार करत आहे. लक्ष्यवेध बिझनेस जत्रा २०२३ मध्ये मिळालेले यश व सकारात्मक प्रतिसादामुळे वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसचे खाद्य व पेय क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे स्थान बळकट झाले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…