Home सामाजिक  क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज ग्रीनटेक एन्व्हायर्नमेंट अवॉर्ड २०२३ सह सन्‍मानित

 क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज ग्रीनटेक एन्व्हायर्नमेंट अवॉर्ड २०२३ सह सन्‍मानित

2 min read
0
0
28

no images were found

 क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज ग्रीनटेक एन्व्हायर्नमेंट अवॉर्ड २०२३ सह सन्‍मानित

मुंबई : क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.या पंखे व निवासी पंपांच्‍या श्रेणीमधील बाजारपेठ अग्रणी कंपनी आणि आपल्‍या कार्यसंचालनांमध्‍ये ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देणाऱ्या ब्रॅण्‍डला महाराष्‍ट्र व गोवा येथील अनुक्रमे त्‍यांच्‍या अहमदनगर व बेथोरामधील प्‍लाण्‍ट्ससाठी २३व्‍या ग्रीनटेक एन्व्हायर्नमेंट अवॉर्ड २०२३ सह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या पुरस्‍काराने क्रॉम्‍प्‍टनच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक, शाश्‍वत व नाविन्‍यपूर्ण पद्धतींचा समावेश करण्‍याप्रती त्‍यांचे उल्‍लेखनीय योगदान व कटिबद्धतेला सन्‍मानित केले आहे. 
२३ व २४ नोव्‍हेंबर २०२३ रोजी सोनमर्ग, जम्‍मू व काश्‍मीर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या या प्रतिष्ठित पुरस्‍कार सोहळ्याने पर्यावरण सर्वोत्तमतेप्रती सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांसाठी फॅन्‍स व पंप्‍स या दोन विशिष्‍ट श्रेणींमधील क्रॉम्‍प्‍टनच्‍या उपलब्‍धीला सन्‍मानित केले. भारत सरकारचे लोकसभेचे माजी खासदार श्री. एन. श्रीधर(आयएएस) आणि सोनमर्ग विकास प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. इलियास हुसैन यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.
गेल्‍या २३ वर्षांपासून ग्रीनटेक फाऊंडेशनद्वारे आयोजित करण्‍यात येणारा ग्रीनटेक एन्व्हायर्नमेंट अवॉर्डस् पर्यावरण संरक्षणाला चालना देण्‍याप्रती समर्पित असलेल्‍या व्‍यक्‍ती, टीम्‍स, युनिट्स व संस्‍थांच्‍या अपवादात्‍मक प्रयत्‍नांना सन्‍मानित करतो. हा पुरस्‍कार त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण व जबाबदार उपक्रमांना प्रशंसित करतो, ज्‍यांचा आपण जगत व काम करत असलेल्‍या पर्यावरणाच्‍या भल्‍यासाठी परिवर्तनाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. नामांकनांनंतर प्रखर प्रक्रिया करण्‍यात आली, ज्‍यामध्‍ये शैक्षणिक व उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधीत्‍व करणारे प्रतिष्ठित व्‍यक्‍ती व तज्ञांचा समावेश असलेल्‍या ज्‍यूरी सदस्‍यांनी मूल्‍यांकन केले.
या उपलब्‍धीबाबत मत व्‍यक्‍त करत क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍ह्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि.च्‍या मॅन्‍युफॅक्‍चरिंग, क्‍वॉलिटी अँड एससीएमचे उपाध्‍यक्ष प्रविण सराफ म्‍हणाले,क्रॉम्‍प्‍टनमध्‍ये आमचे वर्षानुवर्षे शाश्‍वत व ऊर्जा- कार्यक्षम कार्यसंचालनांना प्राधान्‍य देण्‍यावर मुलभूत लक्ष्‍य आहे. या उपलब्‍धीमधून परिसंस्‍थेचे संरक्षण करण्‍याप्रती, शाश्‍वत पद्धतींचा अवलंब करण्‍याप्रती आणि पर्यावरण सर्वोत्तमते करिता सतत प्रयत्‍न करण्‍याप्रती आमच्‍या टीमची सहयोगात्‍मक कटिबद्धता दिसून येते. मी प्रत्‍येक क्रॉम्‍प्‍टन कर्मचाऱ्याचे त्‍यांचे बहुमूल्‍य योगदान, संकल्‍पना व समर्पिततेसाठी मनापासून आभार व्‍यक्‍त करतो, 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…