
no images were found
भारतीय राज्यघटनेमुळेच वंचितांचा विकास – सहाय्यक आयुक्त सचिन साळे
कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेतील कलम ४६ द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी समाज कल्याण विभागाची निर्मिती झाली आहे आणि भारतीय राज्यघटनेमुळेच वंचितांचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. सचिन साळे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील राज्यशास्त्र विभाग अंतर्गत प्लेसमेंट सेल व समाजकल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘भारतीय राज्यघटनेतील कलम ४६ द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन ‘ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. यावेळी संचालक प्रा.डॉ. डी. के. मोरे, उपकुलसचिव डॉ. एस. एम. कुबल, श्री. सी. एस. कोतमिरे उपस्थित होते.
श्री.साळे यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेतील सर्व घटकांचा अर्थ सांगताना समाज कल्याण विभागाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, तृतीयपंथीयांच्या सामाजिक स्थैऱ्यासाठीच्या योजना, शैक्षणिक वसतीगृह योजना अशा विविध घटकांच्या संदर्भात मांडणी केले. यावेळी प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ.के.बी.पाटील,प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ.प्रवीण लोंढे यांनी करून दिली सूत्रसंचालन डॉ. सचिन भोसले यांनी केले व आभार समन्वयक डॉ. सूर्यकांत गायकवाड यांनी मानले.