no images were found
कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचं आणि ओबीसींना बाहेर ढकलायचं… छगन भुजबळांचा गंभीर आरोप
मुंबई : २०१८ साली मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी कोर्टात ओबीसी आरक्षणाविरोधात केस दाखल केली होती. आता ओबीसीमध्ये असलेले तेली, माळी, कुंभार अशा जातींना गैरकायदेशीर समावेश करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचं पुर्नरसर्व्हेक्षण करण्यात यावं य संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली. तोपर्यंत ओबीसी या सर्व जातींना ओबीसींचं आरक्षण रोखण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यामुळे आता ही केस पुन्हा ओपन केली आहे. एका बाजूने कायदेशीर आरक्षण मिळत नाही त्यांना ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसीमध्ये असलेल्यांना हायकोर्टात लढून त्यांना बाहेर काढलं जायचं असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या कायदेशीर लढ्याबाबत आमचं लक्ष असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना हवं तसं आरक्षण देण्याच्या भानगडीत सरकार पडत आहेत. एकाला कुणबी प्रमाणपत्र दिलं की बाकीच्यांना द्यावं लागणार. मग सगळे कुणबी झाले की ओबीसीतले त्यांना अधिकार मिळावेत. शिक्षण, नोकरी, राजकीय असे अधिकार त्यात आहेत. ३७५ जाती आहेत त्यात जर ही सगळी मंडळी आली तर कुणालाच काही मिळणार नाही. ओबीसी तर संपूनच जाणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना वेगळा आरक्षण द्या, असंही भुजबळांनी म्हटलं. यातच कायद्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लढा. त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु आता सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत. यातच मनोज जरांगे पाटील ऐकत नाही म्हणून लगेच ११ हजार झाले. त्यानंतर लगेच १३ हजार झालेत. आता तर आख्या महाराष्ट्रात कार्यालय उघडली असून ज्याला पाहिजे त्यांना दिलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
आता तर ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. एका बाजूला त्यांनी ओबीसीमध्ये सामील व्हायचं अन् दुसऱ्या बाजूने कोर्टात लढून ओबीसींच्या लोकांना आरक्षणातून बाहेर काढायचं. असंही छगन भुजबळांनी म्हटलं.