
no images were found
ओळख पटलेल्या मुलांना पालकांकडे सुपूर्द करण्यात येणार पालक, नातेवाइकांनी संपर्क साधावा
कोल्हापूर : शहरात विविध ठिकाणाहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा नातेवाइकांचा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय कोल्हापूर, बाल कल्याण समिती कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांच्याकडून शोध सुरु असून बालकांच्या पालक व नातेवाइकांनी दिलेल्या दूरध्वनी,मोबाईल वर संपर्क करण्याचे किंवा प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पी. बी. शिर्के यांनी केले आहे.
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या चार अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समिती कोल्हापूर यांच्याद्वारे मानव संसाधन विकास मिशन संचलित करुणालय बालगृह, शिये, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. ही बालके जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामार्फत समिती समोर हजर करण्यात आली होती. या मुलांना त्यांच्या पालक किंवा नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
या कु. दत्तात्रय रघूनाथ पाटील- वय 16 वर्ष 4 महिने, कु. रमेश प्रकाश चौगले- वय 15 वर्ष 11 महिने, कु. मंगेश प्रकाश बुरुड- वय 15 वर्ष 8 महिने व कु. अबोली- वय 13 वर्ष 2 महिने या बालकाच्या पालक नातेवाईक यांनी अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती कोल्हापूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर किंवा मानव संसाधन विकास मिशन संचलित करुणालय बालगृह, शिये, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर किंवा चाइल्ड लाइन कोल्हापूर 9923068135, 9660012496, 112 या क्रमांकावर 30 दिवसांच्या आत संपर्क करावा, असे आवाहन श्री. शिर्के यांनी केले आहे.