
no images were found
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन सेवेत रुजू होण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर: जे वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) या संवर्गातील आहेत व ज्या वैद्यकीय अधिका-यांची नियमित सेवा 5 वर्षे पूर्ण झाली आहे व त्यानंतर ज्या वैद्यकीय अधिका-यांचा अनधिकृत गैरहजर कालावधी हा 5 वर्षे पेक्षा कमी आहे, अशा ज्या वैद्यकीय अधिका-यांना शासन सेवेत रुजू व्हावयाचे आहे, अशा वैद्यकीय अधिका-यांनी दि. 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत आपले विनंती अर्ज कार्यालयीन कामकाजा दिवशी उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर कार्यालयात कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत, असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे(कलकुटे) यांनी केले आहे.