Home सामाजिक मोदींच्याहस्ते जलपूजन अन् लोकार्पण; निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आले पाणी

मोदींच्याहस्ते जलपूजन अन् लोकार्पण; निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आले पाणी

0 second read
0
0
45

no images were found

मोदींच्याहस्ते जलपूजन अन् लोकार्पण; निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आले पाणी

अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी झाले. यावेळी राजूयपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…