Home क्राईम मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

0 second read
0
0
44

no images were found

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

बीड: बीडमधील शहाजानपूर लोणी गावात एका २१ वर्षीय मराठा तरुणाने सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अशोक मते याने स्वतःच्या शेतात आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला.
त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. अशोक मते याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…