
no images were found
इस्रायल आणि हमासच्या युद्धावर चीननं भूमिका स्पष्ट केली आहे.
इस्रायल आणि हमासच्या युद्धाला १८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पण, इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले चालूच आहेत. या युद्धावर चीननं टीका केली होती. पण, आता चीननं आपल्या भूमिकेत बदल केला आहे. इस्रायलला स्वत:चे संरक्षण अधिकार आहे, असं चीननं म्हटलं आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी सोमवारी ( २३ ऑक्टोबर ) फोनवरून चर्चा केली. “आंतरराष्ट्रीय मानवी हितांच्या कायद्याचं पालन करताना प्रत्येक देशाला स्वत:चं संरक्षण करण्याचा अधिकार आहे,” असं मत वांग यी यांनी यावेळी व्यक्त केलं.