no images were found
उत्कर्ष शर्मा आणि सिम्रत कौर यांनी नीति मोहनसह रिक्रिएट केले ‘चल तेरे इश्क में’ गाणे!
भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक काळ सुरू असलेला रिअॅलिटी कार्यक्रम सा रे ग म प हा नव्या फॉरमॅट आणि अतिशय गुणी गायकांच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या स्पर्धक गायकांना संगीत क्षेत्रात आपल्या पायावर उभे करण्यासाठी परीक्षक हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अनु मलिक हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत. सूत्रसंचालक आदित्य नारायणने कार्यक्रमातील रंजकता उच्च ठेवली आहे.येत्या वीकेण्डचा भाग ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे कारण या ‘गदर-2 सक्सेस पार्टी’ भागात अतिशय गुणी कलाकार उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर हे सहभागी होणार आहेत. या भागात या दोन कलाकारांनी ‘चल तेरे इश्क में’ हे गाणे त्याच्या मूळ गायिकेच्या, म्हणजे परीक्षक नीती मोहनच्या साथीने कार्यक्रमाच्या मंचावर सादर केले. या गाण्यावर नृत्य केल्यानंतर या दोन्ही कलाकारांनी ‘गदर-2’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. जेव्हा जेव्हा ते ‘हिंदुस्तान झिंदाबाद है’ ही घोषणा ऐकत, तेव्हा आपल्या अंगावर कसे रोमांच उभे राहात, ते त्यांनी सांगितले.
या गाण्याबद्दल उत्कर्ष शर्मा म्हणाला, “आजकाल चित्रपटगृहात कोणी त्यातील प्रसंग किंवा गाण्यांवर टाळ्या आणि शिट्ट्या मारीत नाहीत. पण मी जेव्हा पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गेलो, तेव्हा तेथे प्रेक्षक धमाल करताना दिसले. त्यांच्या जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटांनी माझं मन उचंबळून आलं. आमच्या चित्रपटात अनेक लोकप्रिय गाणी आहेत, पण या नव्या गाण्याच्या तुलनेत ते गाणं प्रेक्षकांना लगेचच आवडलं आहे, हे दिसून येतं.”
त्याला पुस्ती जोडताना हिमेश रेशमिया म्हणाला, “हा अल्बम नव्याने तयार केला असून त्यात अनेक लोकप्रिय गाणी आहेत, पण त्याच्या जोडीला उत्कृष्ट गायक, उत्तम संगीत आणि सुंदर दृष्यात्मकता लाभलेलं एक नवं गाणं जोडायचं ही गोष्ट खूपच थक्क करणारी आहे. एका नव्या गाण्याला इतका उदंड प्रतिसाद लाभल्याबद्दल संबंधित टीम आणि या गाण्याच्या निर्मात्याचं अभिनंदन!”
चित्रीकरणाबद्दलचा आपला अनुभव सांगताना सिम्रत कौर म्हणाली, “मी या चित्रपटात एका पाकिस्तानी तरुणीची भूमिका साकारीत आहे. पण जेव्हा जेव्हा सनी पाजी ‘जो बोले सो निहाल’ अशी घोषणा करीत, तेव्हा मलाही तिला प्रतिसाद द्यावासा वाटे. पण माझी भूमिका लक्षात घेऊन मला माझ्या मनावर नियंत्रण ठेवावं लागत होतं. एका प्रसंगात तर सेटवर तब्बल 70-80 लोक ‘हिंदुस्तान झिंदाबाद है’ अशा घोषणा करीत होते. तेव्हा मला माझ्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेवर खूप नियंत्रण ठेवावं लागत होतं. तो खरंच एक स्वप्नवत अनुभव होता. जेव्हा जेव्हा आम्ही या प्रसंगाचं चित्रीकरण करीत असू, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी उभं राहात होतं.”उत्कर्ष आणि सिम्रत यांनी हे रंजक किस्से सांगितले असले, तरी ‘गदर-2 सक्सेस पार्टी’च्या भागात ‘सा रे ग म प’तील अन्य स्पर्धकांना गाताना पाहा.