no images were found
लोकप्रिय कलाकार अंकित सिवचचा होणार मालिकेत प्रवेश!
‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ मालिका ही आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडणारी एक परिपक्व प्रेमकथा असून प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यांच्यासारख्या ठळक व्यक्तिरेखा आणि मन गुंतवून ठेवणाऱ्या कथानकाने या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा कायम राखली आहे. अलिकडच्या भागांमध्ये दामिनीने गुनगुनला एका अपघातात कसे जखमी केले आणि त्यानंतर तिची प्रकृती कशी चिंताजनक झाली आहे, ते प्रेक्षकांनी पाहिले. त्रिवेदी कुटुंबाला तिच्या उपचारांचा खर्च प्रवडणारा नसतो आणि अखेरचा उपाय म्हणून ते दामिनीकडेच मदत मागण्यासाठी जातात. मालिकेत इतक्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत असून त्यातच प्रेक्षकांना मालिकेत अभिनेता अंकित सिवचचा कुणाल कश्यपच्या भूमिकेद्वारे मालिकेत प्रवेश होताना दिसेल. कुणाल हा बडा उद्योगपती असतो आणि भारतीय उपखंडात त्याचा व्यापार पसरलेला असतो.
आगामी भागांमध्ये मोहन आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचे महत्त्वाचे कंत्राट मिळवताना दिसेल आणि राधा आणि मोहन हे त्यानिमित्त मालदीवला गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या प्रदर्शनाच्या स्पर्धेचा आयोजक आणि एकमेव गुंतवणूकदार असतो केके ऊर्फ कुणाल कश्यप. तो या दोघांना तिथे भेटतो.
अंकित सिवच आपल्या व्यक्तिरेखेबद्दल म्हणाला, “या मालिकेतील माझी कुणाल कश्यपची व्यक्तिरेखा मला खूप आवडली. कुणाल हा अतिशय श्रीमंत उद्योगपती असतो आणि भारतीय उपखंडात तो प्रसिध्द असतो. तो या प्रदर्शनाच्या स्पर्धेचा आयोजक आणि एकमेव गुंतवणूकदार असतो. या स्पर्धेत मोहन आणि राधा हे एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. तो दामिनीचा मित्र असल्यामुळे राधा आणि मोहन यांच्याबाबत त्याचे पूर्वग्रह असतात. माझ्या प्रसंगांचं चित्रीकरण मालदीवमध्येच होत असून तिथे मी आयुष्यात प्रथमच गेलो आहे. सुंदर बीचेस, चांगल्या स्वभावाचे लोक आणि उत्तम अगत्य शिवाय शून्य प्रदूषण. माझ्यासाटी मालदीवचा अनुभव फारच सुरेख आहे. मालदीवसारख्या ठिकाणी मला कामानिमित्त राहायला मिळत आहे, ही तर पर्वणीच म्हणावी लागेल. मी एलएसडी स्टुडिओज या संस्थेबरोबर पूर्वी काम केलं असल्यामुळे हे लोक मला माझ्या कुटुंबियांसारखेच वाटतात. प्यार का पहला नाम राधा मोहन ही एक लोकप्रिय मालिका असून त्यात मला एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल माझा गौरव झाल्यासारखं वाटतं. या भूमिकेला न्याय देण्याचा आणि तिचा ठसा उमटविण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. सध्या तरी मी इथे मौजमजा करीत असून जीवनाचा आनंद उपभोगीत आहे. शिवाय एकीकडे मी कामही करीत आहे. मालिकेत माझा प्रवेश दणक्यात होणार असून त्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय आहे, ते जाणून घेण्याची मला इच्छा आहे. तब्बल चार वर्षांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनीवर परतताना एक महत्त्वाची भूमिका साकारीत असल्यामुळे अंकित खूपच खुशीत आहे. पण या प्रदर्शनातील स्पर्धा जिंकण्यासाठी राधा आणि मोहन एकमेकांशी जोरदार स्पर्धा करताना दिसतील. परंतु दामिनी हे घडू देईल का की ती या दोघांवर पुन्हा एकदा मात करील?