no images were found
पाणी व अन्न वाया घालवू नका : कुलगुरू डॉ.के प्रथापन
तळसंदे : पाणी व अन्न हे जीवन आहे. वाया चाललेल्या अन्न पाण्यावर कित्येक गरजू लोक जगू शकतात. त्यामुळे कधीही अन्न-पाणी वाया घालवू नये असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ.के प्रथापन यांनी केले. डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील फूड टेक्नॉलॉजी विभाग आयोजित जागतिक अन्न दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले ” अन्न आपल्याला ऊर्जा देते म्हणून आपण उत्साहाने काम करू शकतो. अन्न निर्मिती प्रक्रियेत शेतकरी हे महत्वाची भूमिका बजावतात. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठात अन्न सुरक्षा, उपयोग व कार्यक्षम अन्न या विषयावर एक पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शास्त्रज्ञ डॉ.बाबुराव कुंभार तसेच कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत,परीक्षा नियंत्रक व असोसिएट डीन डॉ.गुरुनाथ मोटे, रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप वाटेगावकर, प्रा.डॉ.विक्रमसिंह इंगळे, डॉ. तानाजी भोसले, प्रा.शीतल पाटील, प्रा.स्वप्नाली भोळे, प्रा.धानेश गवळी, प्रा.नेहा पाटील, स्मितल कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास मार्गदर्शक डॉ बाबुराव कुंभार यांनी अन्न निर्मिती व प्रक्रिया या सर्व बाबीवर प्रकाशझोत टाकला व विद्यार्थ्यांना पोषक आहाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कुलसचिव प्रा. डॉ जयेंद्र खोत यांनी यांनी पोस्टर प्रेझेंटेशन व फूड प्रोजेक्ट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
रिसर्च डायरेक्टर डॉ.संदीप वाटेगावकर म्हणाले ” आज कित्येक लोक एकवेळचे जेवण मिळविण्यासाठी धडपड करतात व एकीकडे वाढदिवसाला केक तोंडाला लावून अन्न वाया घालवितात. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्याचा आदर करायला शिका असे बोलून त्यांनी विद्यार्थ्यांना भारताबरोबरच परदेशातही अन्न निर्मिती व प्रक्रियेमध्ये असणाऱ्या विविध संधीबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ गुरुनाथ मोटे यांनी केले. सूत्रसंचालन सार्थक कर्णिक व प्राची भाटिया यांनी केले. पाहुण्यांची ओळख विश्वजीत पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विक्रमसिंह इंगळे यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ.संदीप वाटेगावकर, डॉ.सागर चव्हाण, प्रा.प्रवीण उके, प्रा शीतल पाटील व प्रा स्वप्नाली भोळे यांनी काम पाहिले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता यांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले.