
no images were found
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात देश, विदेशातील नागरिकांनी सहभागी व्हावे – हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूरच्या दसऱ्याला म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव जगभरात पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यावर्षी पासून हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कोल्हापुरात नवरात्रोत्सवात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
जगभरातील नागरिकांनी कोल्हापुरात येवून श्री अंबाबाई, श्री जोतिबाचे दर्शन घ्यावे, कोल्हापूरची निसर्गसंपन्न पर्यटन स्थळे पहावी. तसेच शाही दसरा महोत्सवांतर्गत राजेशाही थाटात होणारे सीमोल्लंघन व 10 दिवस होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन दसऱ्याचा आनंद लुटावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.