no images were found
दिवाळीत मोठा धमाका होणार !शिंदे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने शरद पवार गटाची चिंता वाढली
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलेत. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत येणार असल्याचे संकेत व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
पित्रपक्ष संपल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्यात. मंत्रिमंडळ विस्ताराआधी राज्यात मोठा राजकीय धमाका होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. याच बाबत उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना विचारले असता त्यांनी लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगीतलं. तसेच शरद पवार गटाला आणखीन मोठी खिंडार पडणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या सरकारसोबत येण्याच्या चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहेत. यामुळेच कदाचित मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केलाय.
यंदा दिवाळीत मोठा धमाका!
लवकरच तो विस्तार होईल असं सांगत दसरा दिवाळीत नेहमी धमाके होतच असतात मात्र यावेळी मोठा धमाका होईल, असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केला आहे. यामुळं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कोणता बडा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत जाणार हे पाहावं लागणार आहे.