
no images were found
शिवाजी विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात मानसशास्त्र अधिविभाग आणि व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समूपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे’ आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अधिविभागातील विदयार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले यांचे उदघाटन वायसीएसआरडीचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना डॉ. माळी म्हणाले, समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.
मानसशास्त्र विभाग यामध्ये निश्चितच पुढाकार घेईल. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी अधिविभागाचे प्र-विभागप्रमख डॉ.सुभाष कोंबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अश्विनी पाटील यांनी केले. अधिविभागतील विदयार्थ्यांनी विविध अधिविभागांसमोर रॅली व पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी अधिविभागतील डॉ.साक्षी गावडे, डॉ.मिंलिद सावंत, डॉ.विशाल पाटील, समुपदेशक सत्यजित देसाई उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधिविभागातील विदयार्थ्यांनी उत्साहवर्धक सहभाग नोंदवला.