Home शासकीय पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज स्वीकारणार –  डॉ. प्रमोद बाबर

पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज स्वीकारणार –  डॉ. प्रमोद बाबर

22 second read
0
0
46

no images were found

पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज स्वीकारणार  डॉ. प्रमोद बाबर

 

        कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत 50 टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर दिनांक 16 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी कळविले आहे.

            जिल्ह्यातील 100 पशुपालकांना 10 हजार रुपयांच्या मर्यादेत 50 टक्के अनुदानावर 2 एच पी कडबाकुट्टी मशिन वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पशुपालकाकडे किमान 5 जनावरे असणे आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील 72 विधवा, परितक्त्या, दारिद्रय रेषेखालील महिलांना 13 हजार 805 रुपयांच्या मर्यादेत 75 टक्के अनुदानावर 2 शेळींचा गट वाटप करण्यात येणार आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. बाबर यांनी केले आहे.

Load More Related Articles

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…